Tumbadchi Manjula OTT: हॉरर अन् कॉमेडीचा तडका; 'तुंबाडची मंजुळा' आता घरबसल्या पाहा, OTTवर कधी रिलीज होणार?
Tumbadchi Manjula OTT: तुंबाडची मंजुळा हा सिनेमा कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार?
Continues below advertisement

Tumbadchi Manjula OTT
Continues below advertisement
1/8
'तुंबाडची मंजुळा' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. 'देऊळ बंद 2', 'राजा शिवाजी' असे 100 कोटींचा टप्पा ओलांडणारे 2 सिनेमे एकामागोमाग एक रिलीज झाले. 'तुंबाडती मंजुळा' हा सिनेमा देखील रिलीज झाला.
2/8
'तुंबाडची मंजुळा' या सिनेमाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. जर, आपण हा हॉरर कॉमेडी सिनेमा थिएटरमध्ये जाऊन पाहिला नसेल, तर घरबसल्याही आपण पाहू शकता.
3/8
'तुंबाडची मंजुळा' हा सिनेमा आता ओटीटी विश्वात एन्ट्री करण्यास सज्ज झाला आहे. पण हा सिनेमा नेमकं कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार? आणि कधी रिलीज होणार? पाहूयात.
4/8
समीक्षकांची प्रशंसा आणि प्रेक्षकांचे प्रेम या दोन्ही गोष्टी जिंकल्यानंतर सई ताम्हणकर अभिनीत 'तुंबाडची मंजुळा' हा सिनेमा झी 5 मराठी अॅपवर प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे.
5/8
विविध कोरगावकर दिग्दर्शित आणि झी स्टुडिओज निर्मित 'तुंबाडची मंजुळा' या सिनेमात सई ताम्हणकर व्यतिरिक्त, जितेंद्र जोशी, मकरंद अनासपुरे आणि उषा नाडकर्णी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
Continues below advertisement
6/8
या सिनेमात हॉरर, विनोद आणि हृदयस्पर्शी स्टोरीचं मिश्रण आहे.
7/8
या सिनेमाबाबत विविध कोरगावकर म्हणाले की, 'या सिनेमाला प्रेक्षकांकडून मिळालेले प्रेम खरोखरंच अतुलनीय आहे. दरम्यान, आता 'तुंबाडची मंजुळा' झी 5 वर आपल्या पाहता येईल'.
8/8
माहितीनुसार, 7 ऑगस्ट रोजी 'तुंबाडची मंजुळा' हा सिनेमा झी 5वर रिलीज होणार आहे.
Published at : 03 Aug 2026 05:07 PM (IST)