सई ताम्हणकरची महत्त्वाची भूमिका असलेली वेब सीरिज प्रदर्शित होणार...
Sai Tamhankar Latest News : काही महिन्यांपूर्वीच सई ताम्हणकरची भूमिका असलेला भक्षक चित्रपट ओटीटीवर रिलीज झाला होता. त्यानंतर आता सई ताम्हणकरची महत्त्वाची भूमिका असलेली वेब सीरिज प्रदर्शित होत आहे.
saie
1/9
अभिनेत्री सई ताम्हणकरने (Sai Tamhankar) मराठी चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटवल्यानंतर आता हिंदी सिनेजगतात आपला छापस सोडत आहे.
2/9
काही महिन्यांपूर्वीच सई ताम्हणकरची भूमिका असलेला 'भक्षक' चित्रपट ओटीटीवर रिलीज झाला होता.
3/9
त्यानंतर आता सई ताम्हणकरची महत्त्वाची भूमिका असलेली वेब सीरिज (Web Series) प्रदर्शित होत आहे. 'डब्बा कार्टेल' (Sai Tamhankar) ही वेब सीरिज प्रदर्शित होणार असून सई ताम्हणकरची महत्त्वाची भूमिका आहे. नेटफ्लिक्सवर ही वेब सीरिज प्रदर्शित होणार आहे.
4/9
अभिनेता-निर्माता फरहान अख्तर याच्या निर्मिती संस्थेने या वेब सीरिजची निर्मिती केली आहे. नुकतंच या वेब सीरिजचा टीझर लाँच करण्यात आला.
5/9
या टीझरमध्ये अभिनेत्री शबाना आझमी, ज्योतिका, गजराज राव आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. या दिग्गजांसोबत सई ताम्हणकरची महत्त्वाची भूमिका साकारणार आहे.
6/9
डब्बा कार्टेल ही वेबसीरिज अमली पदार्थाच्या तस्करीवर आधारीत आहे. जेवणाच्या डब्याच्या मार्फत अमली पदार्थाची विक्री होत असल्याचे टीझरमध्ये दिसले आहे. ही वेब सीरिज उत्कंठा वाढवणारी असल्याचे टीझरवरून दिसत आहे.
7/9
सई ताम्हणकरने या वेबसीरिजची टीझर आपल्या सोशल मीडिया अकाउटंवरून शेअर केला आहे. हा असा डब्बा आहे, ज्याला तुम्ही कधीच विसरू शकत नाही, अशी कॅप्शन सई ताम्हणकरने दिली.
8/9
'डब्बा कार्टेल'मध्ये अभिनेत्री शबाना आझमी, ज्योतिका, निमिषा सजयन, अंजली आनंद, गजराज राव, लिलैट दुबे आणि जिशू सेनगुप्ता अशा दिग्गज कलाकारांची फौज आहे.
9/9
नेटफ्लिक्सने आपल्या सुपरहिट वेब सीरिजचे पुढचा सीझनही जाहीर केला आहे. यामध्ये 'खाकी: द बंगाल चॅप्टर', 'कोटा फॅक्टरी सीझन 3', 'काली काली आंखे सीझन 2' आणि 'फॅब्युलस लाईव्हज ऑफ बॉलिवूड वाइव्हज' यांचा समावेश आहे. Netflix वेब सीरीजच्या या यादीमध्ये डब्बा कार्टेल (Dabba Cartel), मामला लीगल है (Mamla Legal Hai), मिसमॅच (Mismatched), आयसी814 (IC814) आणि मांडला मर्डर्स (Mandala Murders) यांचा समावेश आहे.
Published at : 01 Mar 2024 06:03 PM (IST)