PHOTO: सारेगमप लिटिल चॅम्प्सने घेतली राज ठाकरेंची भेट, महाअंतिम सोहोळ्याआधी घेतले आशीर्वाद!
SRGMP : सारेगमप (SRGMP) लिटिल चॅम्प्सचा महाअंतिम सोहोळ्याआधी स्पर्धकांनी राज ठाकरेंचे आशीर्वाद घेतले आहेत. पंचरत्नांचं योग्य मार्गदर्शन, मृण्मयी देशपांडेचे खुमासदार सूत्रसंचालन आणि 14 लिटिल चॅम्प्सच्या धमाकेदार सादरीकरणामुळे 'सारेगमप' लिटिल चॅम्प्सच हे नवीन पर्व चांगलेच गाजले. अगदी सुरुवातीपासूनच प्रेक्षकांनी या पर्वाला पसंती दर्शवली. (photo:zeemarathiofficial/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया 14 स्पर्धकांचा प्रवास प्रेक्षकांनी पाहिला. या 14 अप्रतिम गाणाऱ्या स्पर्धकांमध्ये कोण वरचढ आहे हा निर्णय घेणं पंचरत्नांसाठी सुद्धा कठीण होतं. ही स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आलेली आहे. (photo:zeemarathiofficial/ig)
पलाक्षी दीक्षित, ओंकार कानेटकर, गौरी गोसावी, प्रज्योत गुंडाळे, सारंग भालके, रीत नारंग आणि स्वरा जोशी हे सात स्पर्धक महाअंतिम सोहळ्यात एकमेकांशी स्पर्धा करणार आहेत. हे सातही स्पर्धक प्रेक्षकांचे लाडके आहेत. त्यामुळे त्यांच्यामध्ये कोण विजेता ठरणार हे सांगणं प्रेक्षकांसाठीदेखील अवघड आहे. (photo:zeemarathiofficial/ig)
महाअंतिम सोहोळ्याआधी या 7 स्पर्धकांनी मनसे प्रमुख 'राज ठाकरे' यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. दरम्यान राज ठाकरेंना भेटून स्पर्धक भारावून गेले. (photo:zeemarathiofficial/ig)
राज ठाकरेंनी या मुलांना इलेक्ट्रिक तानपुरा आणि तबला भेट दिला. दरम्यान राज ठाकरेंनी त्यांच्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला. सारेगमप लिटिल चॅम्प्सचा महाअंतिम सोहळा येत्या रविवारी 5 डिसेंबर रोजी संध्याकाळी 7 वाजता झी मराठीवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. (photo:zeemarathiofficial/ig)
याआधीदेखील 'मन उडू उडू झालं' मालिकेतील 'इंद्रा आणि दिपू'ने राज ठाकरेंची भेट घेतली होती. इंद्रा आणि दिपू म्हणजेच अभिनेता अजिंक्य राऊत आणि अभिनेत्री ऋता दुर्गुळे यांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती. (photo:zeemarathiofficial/ig)