Rubina Dilaik: रुबिनाने पिवळ्या रंगाच्या हाय थाई स्लिट ड्रेसमध्ये दाखवला स्टायलिश अवतार; चाहते घायाळ!
टीव्ही अभिनेत्री रुबिना०ने तिच्या अभिनयाच्या जोरावर घराघरात एक वेगळी आणि खास ओळख मिळवली आहे. तिला तिच्या सुपरहिट टीव्ही शो 'छोटी बहू'मधून विशेष लोकप्रियता मिळाली. (फोटो :rubinadilaik/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतेव्हापासून ती सुसंस्कृत सून आणि मुलीच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. मात्र, खऱ्या आयुष्यात रुबिना तिच्या पडद्यावरील जगापेक्षा खूप वेगळी आहे.(फोटो :rubinadilaik/ig)
रुबिना खऱ्या आयुष्यात खूपच बोल्ड आहे. त्याची झलक तिच्या इंस्टाग्राम पेजवरही अनेकदा पाहायला मिळते. 'बिग बॉस 14' चे विजेतेपद पटकावल्यानंतर रुबिनाचे वेगळे रूप लोकांसमोर आले आहे. अशात सोशल मीडियावर तिचे फॅन फॉलोअर्सही खूप वाढत आहे. (फोटो :rubinadilaik/ig)
आता पुन्हा रुबिनाने तिचा सिझलिंग लुक चाहत्यांसोबत शेअर केला आहे. या फोटोंमध्ये तिने पिवळ्या रंगाचा हाय थाई स्लिट वन शोल्डर मिनी ड्रेस घातलेला दिसत आहे.(फोटो :rubinadilaik/ig)
रुबिनाच्या करिअरबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच 'अर्ध' या आगामी चित्रपटात दिसणार आहे. (फोटो :rubinadilaik/ig)
डिजिटल प्लॅटफॉर्म Zee5 वर रिलीज होत असलेल्या या चित्रपटात रुबीना राजपाल यादवसोबत मुख्य भूमिकेत दिसत आहे. या चित्रपटाद्वारे ती मोठ्या पडद्यावर तिच्या करिअरची सुरुवात करणार आहे.(फोटो :rubinadilaik/ig)