PHOTO: 'तुझे मेरी कसम' म्हणत रंगली रितेश-जिनिलियाची लव्हस्टोरी!
रितेश-जिनिलिया 3 फेब्रुवारी 2012 रोजी लग्नबंधनात अडकले होते. आज त्यांच्या लग्नाला 12 वर्षे पूर्ण झाली आहेत. (Image Source : Instagram/ riteishd)
(Image Source : Instagram/ riteishd)
1/9
बॉलिवूडसह मराठी मनोरंजनसृष्टी गाजवणारा रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जिनिलिया डिसुजा (Genelia Dsouza) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. महाराष्ट्राचे लाडके दादा-वहिनी म्हणून ते ओळखले जातात. (Image Source : Instagram/ riteishd)
2/9
रितेश-जिनिलिया 3 फेब्रुवारी 2012 रोजी लग्नबंधनात अडकले होते. आज त्यांच्या लग्नाला 12 वर्षे पूर्ण झाली आहेत. (Image Source : Instagram/ riteishd)
3/9
रितेश-जिनिलियाच्या सुखी संसाराची 12 वर्षे खूपच कमाल होती. (Image Source : Instagram/ riteishd)
4/9
रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांची लव्हस्टोरी खूपच कमाल आहे. (Image Source : Instagram/ riteishd)
5/9
'तुझे मेरी कसम'पासून ते महाराष्ट्राचे लाडके दादा-वहिनी होण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास खूपच कमाल होता. रितेश-जिनिलियाची पहिली भेट 'तुझे मेरी कसम' या सिनेमाच्या सेटवर झाली. पण त्यावेळी जिनिलियाने रितेशकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं होतं. पण पुढे त्यांच्यात मैत्री झाली. (Image Source : Instagram/ riteishd)
6/9
'तुझे मेरी कसम'पासून ते महाराष्ट्राचे लाडके दादा-वहिनी होण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास खूपच कमाल होता. रितेश-जिनिलियाची पहिली भेट 'तुझे मेरी कसम' या सिनेमाच्या सेटवर झाली. पण त्यावेळी जिनिलियाने रितेशकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं होतं. पण पुढे त्यांच्यात मैत्री झाली. 'तुझे मेरी कसम'नंतर त्यांचा 'मस्ती' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान ते एकमेकांच्या प्रेमात पडले. दहा वर्षे ते एकमेकांना डेट करत होते. (Image Source : Instagram/ riteishd)
7/9
10 वर्षांच्या डेटिंगनंतर त्यांनी 3 फेब्रुवारी 2012 रोजी लग्न करण्याचा निर्णय घेतला. ख्रिश्चन आणि हिंदू अशा दोन्ही पद्धतीत त्यांचं लग्न झालं होतं. रितेश-जिनिलियाच्या मुलांची नावे रियान आणि राहिल अशी आहेत. (Image Source : Instagram/ riteishd)
8/9
रितेश जिनिलियाला जीन्स या नावाने हाक मारतो. तर जिनिलिया रितेशला प्रेमाने ढोलू अशी हाक मारते. (Image Source : Instagram/ riteishd)
9/9
लग्नानंतर जिनिलिया मनोरंजनसृष्टीपासून दूर होती. पण मुलं मोठी झाल्यानंतर आता तिने पुन्हा एकदा 'वेड' (Ved) या सिनेमाच्या माध्यमातून मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं आहे. रितेश-जिनिलियाच्या आगामी सिनेमांची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. (Image Source : Instagram/ riteishd)
Published at : 03 Feb 2024 02:13 PM (IST)