सेन्सॉर बोर्डाच्या निर्देशानंतर राजा शिवाजी किती तासांचा असणार? Animalसह धुरंधरलाही टाकलं मागे?
Raja Shivaji to Run for Over 3 Hours: रितेश देशमुख यांचा राजा शिवाजी या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहे.

Raja Shivaji to Run for Over 3 Hours
1/8
महाराष्ट्रातील लोकप्रिय अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) सध्या 'राजा शिवाजी' (Raja Shivaji) या ऐतिहासिक चित्रपटामुळे चर्चेत आहे. या सिनेमात तो छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारत आहे. ट्रेलर पाहून प्रेक्षकांनी हा सिनेमा पाहण्याची उत्सुकता दर्शवली.
2/8
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची शौर्य गाथा मोठ्या पडद्यावर अनुभवण्यासाठी सगळे सज्ज आहेत. या सिनेमात मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतील कलाकारांची फौज पाहायला मिळत आहे.
3/8
या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा रितेश देशमुखने सांभाळली असून, हा सिनेमा 1 मे अर्थात महाराष्ट्र दिनानिमित्त संपूर्ण देशात प्रदर्शित होणार आहे.
4/8
हा ऐतिहासिक सिनेमा मराठीसह हिंदी भाषेत प्रदर्शित होत आहे. दरम्यान, हा सिनेमा किती तासांचा असेल? यावर बरीच चर्चा रंगत आहे.
5/8
हा सिनेमा 2 तासांचा असेल किंवा त्याहून कमी असेल, अशी चर्चा प्रेक्षकवर्गामध्ये आहे. पण हा सिनेमा दोन किंवा अडीच नाही तर, तब्बल 3 तास 15 मिनिटांचा असणार आहे.
6/8
3 तास 15 मिनिटांच्या या सिनेमात छत्रपती शिवाजी महाराज यांची शौर्य गाथा दाखवण्यात येणार आहे.
7/8
या ऐतिहासिक सिनेमाचा रनटाईम जास्त असल्यामुळे प्रेक्षकांनी आनंद व्यक्त केला आहे.
8/8
सध्या 'राजा शिवाजी' या सिनेमासाठी अॅडव्हान्स बुकिंग सुरू झाले असून, अवघ्या काही तासांत 1500 हून अधिक तिकिटांची विक्री झाली आहे.
Published at : 28 Apr 2026 04:37 PM (IST)