आर्चीचं अनोखं बर्थडे सेलिब्रेशन! जिल्हा परिषदेच्या शाळांतील तीनशे विद्यार्थांच्या पालकांना 300 वाफेचे मशीन वाटप

रिंकू राजगुरूकडून वाढदिवसानिमित्त नेब्युलायझरचं वाटप

1/10
सैराटाच्या रिंकू राजदुरूने तिचा वाढदिवस 300 विद्यार्थ्यांसाठी वाफेची मशीन वाटून साजरा केला.
2/10
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनावश्यक खर्च टाळून आज रिंकू राजगुरू हिने कुटुंबासोबत कोरोना जनजागृती करत आपला वाढदिवस साजरा केला.
3/10
रिंकू राजगुरू हिच्या वाढदिवसानिमित्त राजगुरू कुटुंबियांच्या वतीने महाळुंग परिसरातील सर्व शाळांतील तीनशे विद्यार्थ्यांच्या पालकांना रिंकूच्या शुभहस्ते वाफेचे मशीन वाटप करण्यात आले.
4/10
Rinku Rajguru Nebulizer Distribution
5/10
आर्चीचं अनोखं बर्थडे सेलिब्रेशन! जिल्हा परिषदेच्या शाळांतील तीनशे विद्यार्थांच्या पालकांना 300 वाफेचे मशीन वाटप
6/10
रिंकूच्या वाढदिवसानिमित्त वडील महादेव राजगुरू, आई आशा राजगुरू यांच्यासह रिंकू हिने महाळुंग परिसरातील जिल्हा परिषद शाळेला भेट दिली.
7/10
मायनर, मुंडफणेवाडी, भोसलेवस्ती, काळेवस्ती, घारमाळकरगट, रेडेवस्ती, जमदाडेवस्ती, लाटेवस्ती, श्रीपूर या शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांना वाफेचे मशीन वाटप करण्यात आले.
8/10
यावेळी केंद्रप्रमुख हर्षवर्धन नाचणे, रिंकूचे चुलते अशोक राजगुरू, अजित पवळ, प्रशांत चिंचकर यांच्यासह शाळा व्यवस्थापन समित्यांचे प्रतिनिधी, सुभाष मिसाळ, समीर लोणकर, दशरथ डोलारे, राहुल थोपटे, दत्तात्रय पराडे, संगीता धोत्रे, कृष्णदेव माने, दिलीप उकिरडे हे मुख्याध्यापक तसेच अंकुश वाघमारे, मनिषा नरुटे, रेहाना तांबोळी हे शिक्षक व पालक उपस्थित होते.
9/10
वाढदिवसासाची पार्टी न करता त्या पैशाचा योग्य वापर करत इतरांना मदत करण्याच्या रिंकूच्या या निर्णयाचं अनेकांनी कौतुक केलं.
10/10
Rinku Rajguru Birthday Celebration
Sponsored Links by Taboola