PHOTO: ऋचा चड्ढाने केलं स्टायलिश साडीत फोटोशूट, दिल्या सिझलिंग पोज!
बॉलीवूड अभिनेत्री ऋचा चढ्ढाने आपल्या उत्कृष्ट अभिनयाने लोकांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण केले आहे. कोणत्याही प्रकारच्या भूमिकेशी ती स्वत:ला जुळवून घेऊ शकते हे तिने नेहमीच सिद्ध केले आहे.(फोटो :therichachadha/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएकीकडे ऋचा आपल्या अभिनयाने बड्या कलाकारांना मात देत असतानाच बोल्डनेसच्या बाबतीत ती कुणापेक्षा कमी नाही.(फोटो :therichachadha/ig)
ऋचा कधी तिच्या चित्रपटांमुळे, कधी तिच्या लव्ह लाईफमुळे तर कधी तिच्या लुक्समुळे चर्चेत असते. सध्या ती अली फजलसोबतच्या लग्नाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. (फोटो :therichachadha/ig)
आता अभिनेत्रीने इतकं धमाल फोटोशूट केलं आहे की सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या आहेत. यामध्ये तीने स्टायलिश ब्लू कलरची साडी परिधान केलेली दिसत आहे.(फोटो :therichachadha/ig)
लूक पूर्ण करण्यासाठी तिने स्मोकी मेक-अप केला आहे आणि तिचे केस कुरळे आणि मोकळे सोडले आहेत.(फोटो :therichachadha/ig)
ऋचाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती तिच्या आगामी 'फुक्रे 3' या चित्रपटाविषयी बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. याशिवाय तो अभी तो पार्टी शुरू हुई है या चित्रपटातही दिसणार आहे. बॉलिवूडशिवाय रिचा अनेक वेब सीरिजचाही भाग आहे.(फोटो :therichachadha/ig)