Sushant Singh Rajput: 'हडळ', 'काळी जादू करणारी'..; अभिनेत्रीवर होता सुशांत सिंह राजपूतला संपवण्याचा आरोप, सुंदर असूनही इंडस्ट्रीत काम मिळेना
Rhea Chakraborty Life After Sushant singh rajput: सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर रिया चक्रवर्तीवर अनेक आरोप झआले,
Continues below advertisement

Rhea Chakraborty Life After Sushant singh rajput
Continues below advertisement
1/8
दिवंगत सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर रिया चक्रवर्तीला प्रचंड ट्रोल करण्यात आलं. ती अनेकदा वादाच्या भोवऱ्यात अडकली. मोठ्या वादांमुळे तिला तुरुंगवासही भोगावा लागला होता. सोशल मीडियावर या अभिनेत्रीला अनेकांनी 'हडळ', 'डायन' म्हणून ट्रोल केलं.
2/8
आज रिया चक्रवर्तीचा जन्म दिवस. तिचा 1 जुलै 1992 रोजी बंगळूरू येथे जन्म झाला. रियाने 2009 साली 'एमटीव्ही स्कूटी टीन दिवा' या कार्यक्रमात स्पर्धक म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. जिथे ती उपविजेती ठरली.
3/8
अभिनय करिअरची सुरुवात तिने तेलुगु सिनेमा 'तुनीगा तुनीगा' मधून केली. यानंतर 2013 साली 'मेरी डॅड की मारुती'या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं.
4/8
यानंतर तिनं अनेक सिनेमात काम केलं. फिल्म 'जलेबी'तून तिला विशेष प्रसिद्धी मिळाली. महेश भट्ट यांच्यासोबतचा तिचा फोटो सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाला होता.
5/8
2020 साली अभिनेत्री सुशांत सिंह राजपूतसोबत असलेल्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आली होती. सुशांतचा घरातच मृतदेह आढळून आला होता. यानंतर रिया चक्रवर्तीवर गंभीर आरोप करण्यात आले होते. अभिनेत्याच्या मृत्यूमागे रियाचा हात असल्याचा गंभीर आरोप तिच्यावर करण्यात आला होता.
Continues below advertisement
6/8
तिची, त्याला कुटुंबापासून दूर ठेवणे, ड्रग्जचा व्यवहार करणे या आरोपांखाली अभिनेत्रीची चौकशी करण्यात आली होती. या काळात तिने 27 दिवस न्यायालयीन कोठडीत घालवले. रियाने तिच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले.
7/8
या संपूर्ण घटनेदरम्यान, तिला प्रचंड ट्रोल करण्यात आलं. काहींनी तिला 'गोल्ड डिगर', 'डायन', 'हडळ' आणि काळी जादू करणारी म्हटलं.
8/8
याचा थेट परिणाम तिच्या करिअरवरही झाला. तिनं एमटीव्हीच्या 'रोडीज' या शोमध्ये गँग लीडर म्हणून पुनरागमन केले आहे.
Published at : 01 Jul 2026 05:11 PM (IST)