प्रशस्त बाल्कनी, झोपाळा अन् निवांत क्षण... मराठमोळ्या दिग्दर्शकाचं अलिबागमधील आलिशान फार्महाऊस पाहिलंत? Photos

अनेक नेटकऱ्यांनी “हे घर पाहून मन शांत झालं”, “खूपच सुंदर आणि पॉझिटिव्ह वाइब्स देणारं घर”, “वॉव… ” अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Continues below advertisement

Marathi Director Farmhouse

Continues below advertisement
1/9
मराठी सिनेसृष्टीला ‘नटरंग’, ‘टाइमपास’, ‘बालगंधर्व’, ‘न्यूड’सारख्या दर्जेदार कलाकृती देणारे दिग्दर्शक रवी जाधव नेहमीच चर्चेत असतात. सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या रवी जाधव यांच्या नुकत्याच शेअर झालेल्या एका पोस्टने मात्र चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. कारण आहे, त्यांचं अलिबागमधील सुंदर फार्महाऊस!
2/9
रवी जाधव यांनी त्यांच्या सेकंड होमचे काही खास फोटो शेअर केले आहेत. या ठिकाणी आलो की मनाला प्रचंड शांती मिळते आणि नव्यानं काहीतरी करण्याची प्रेरणा मिळते, असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
3/9
रवी जाधव यांचं हे फार्महाऊस अलिबागमधील नागाव परिसरात असून निसर्गाच्या अगदी सान्निध्यात वसलेलं आहे.
4/9
या फार्महाऊसचं नाव आहे ‘Turtle Oasis’. चारही बाजूंनी हिरवळ, उंच नारळाची झाडं, शांत वातावरण आणि मोकळी हवा… हे घर म्हणजे खरंच स्वप्नवत वाटतं.
5/9
प्रशस्त बाल्कनी, घरातला सुंदर झोपाळा, दरवाज्यासमोरच असलेलं तुळशी वृंदावन आणि आजूबाजूला पसरलेली झाडं पाहून कोणालाही भुरळ पडेल, असंच हे ठिकाण आहे.
Continues below advertisement
6/9
रवी जाधव यांच्या या घराचे फोटो पाहताच सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस पडला आहे. ‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्री जुई गडकरी हिनं “Peaceful” अशी प्रतिक्रिया दिली आहे.
7/9
रवी जाधव यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर त्यांचा आगामी चित्रपट ‘फुलवरा’ पुढील वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट २०२६ च्या दिवाळीत प्रदर्शित होणार असल्याची घोषणा त्यांनी नुकतीच केली आहे.
8/9
घराच्या इंटिरिअरमध्ये मॉडर्न लूकसोबत पारंपरिक टच देण्यात आला असून साधेपणा आणि सौंदर्य यांचा सुंदर मेळ या फार्महाऊसमध्ये पाहायला मिळतो.
9/9
आम्ही जेव्हा-जेव्हा याठिकाणी भेट देतो तेव्हा मनाला शांती मिळते आणि नवीन काहीतरी करण्याची प्रेरणा मिळते असंही रवी जाधव यांनी म्हंटलय
Sponsored Links by Taboola