नाकात नथ, कानात झुमके अन् नववारी साडी; साऊथच्या रश्मिकाचा मराठमोळा ठसका
पुष्पामधील श्रीवल्ली अर्थात रश्मिका मंधानाला अल्पावधीतच प्रसिद्धी मिळाली. रश्मिकाचे कोट्यवधी चाहते आहेत. रश्मिकाच्या अदांवर अनेकजण फिदा आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरश्मिका मंधानाचा मराठमोळा अंदाज सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
‘झी चित्र गौरव पुरस्कार’मध्ये रश्मिका मंधाना सहभागी झाली आहे.
इतकंच नाही तर या कार्यक्रमामध्ये रश्मिकाने लावणीही सादर केली आहे. या कार्यक्रमातील तिचे काही फोटो सोशल मीडियावर खूपच चर्चेत आले आहेत.
हातात बांगड्या, नाकात नथ, गळ्यात हार अन् नववारी साडीमध्ये रश्मिका लावणी सादर करणार आहे.
रश्मिकाचा हा मराठमोळा अंदाज चर्चेत आहे. श्रीवल्ली तेरी झलक... असेच चाहते म्हणत आहेत.
मराठमोळ्या अंदाजातील रश्मिकाचे फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.
या कार्यक्रमात रश्मिका मराठी बोलतानाही दिसत आहे.
विशेष म्हणजे ही लावणी तिने वन टेक मध्ये केली आहे, सोबतच ती निलेश साबळे आणि अवधूत गुप्ते यांच्यासोबत काही मराठी किस्से देखील शेअर करताना दिसेल.