Gold Smuggling Case: दर खेपेला 15KG सोनं लपवून आणायची; किती कमवायची रान्या राव? खळबळजनक आकडा समोर

Ranya Rao: सोन्याची तस्करी हा रान्या रावसाठी खूप फायदेशीर व्यवहार बनला होता. डीआरआयच्या मते, दुबईहुन सीमाशुल्क न भरता 15 किलो सोनं आणून ती दरवेळी सुमारे 50 लाख रुपयांचा थेट नफा कमवत होती.

Ranya Rao Gold Smuggling Case

1/10
प्रसिद्ध कन्नड चित्रपट अभिनेत्री रान्या राव हिचं नाव सध्या एका मोठ्या सोन्याच्या तस्करी प्रकरणात समोर आलं आहे.
2/10
दुबईहून मोठ्या प्रमाणात सोन्याची तस्करी करण्याचा प्रयत्न करताना डायरेक्टोरेट ऑफ रेवेन्यू इंटेलिजेंसनं (DRI) तिला पकडलं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तिनं यापूर्वीही अनेकदा तस्करी केली होती, पण यावेळी एजन्सीकडे ठोस माहिती होती.
3/10
DRI च्या या कारवाईमुळे सोन्याच्या तस्करीत सहभागी असलेल्या इतर अनेक नावांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. या रॅकेटशी संबंधित आणखी लोकांची ओळख पटवली जात असून याप्रकरणात लवकरच मोठे खुलासे होऊ शकतात, असं तपास यंत्रणांचं म्हणणं आहे.
4/10
रान्या रावनं 2014 मध्ये 'माणिक्य' या कन्नड चित्रपटातून पदार्पण केलं आणि नंतर 'वगाह' आणि 'पटकी' सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं, परंतु अचानक ती इंडस्ट्रीतून गायब झाली.
5/10
मिळालेल्या माहितीनुसार, तिनं दुबईमध्ये आपलं नवं घर स्थापन केलं. तसेच, तिथे राहण्यासाठी रेजिडेंस आयडेंटिटीही मिळवली.
6/10
फिल्म इंडस्ट्रीमधून गायब झाल्यानंतर, रान्या बेकायदेशीर कामं करू लागली. भारत आणि दुबईमधील सोन्याच्या किमतीतील फरकाचा फायदा घेण्यासाठी तिनं सोन्याच्या तस्करी करणाऱ्या टोळीशी हातमिळवणी केली आणि तस्करी सुरू केल्याचं सांगण्यात येत आहे.
7/10
भारतात सोन्याची किंमत दुबईपेक्षा खूपच जास्त आहे. सीमाशुल्क न भरता भारतात सोनं आणून तस्कर मोठा नफा कमावतात. डीआरआयच्या सूत्रांनुसार, रान्या राव एका वेळी सुमारे 15 किलो सोनं दुबईहून भारतात आणायची, ज्यामुळे तिला तब्बल 50 लाख रुपयांचा थेट नफा मिळत असे.
8/10
गेल्या काही महिन्यांत अभिनेत्रीनं सोन्याची तस्करी करण्यासाठी दुबई टू भारत अशा अनेक खेपा घातल्या आहेत.
9/10
असा आरोप केला जातोय की, तिनं विमानतळ सुरक्षा नियमांपासून दूर राहण्यासाठी तिच्या वडिलांच्या प्रतिष्ठेचा वापर केला. पण, यावेळी डीआरआयनं तिच्या हालचालींवर लक्ष ठेवलं आणि अखेर तिला पकडलं.
10/10
अटकेनंतर रान्यानं स्वतःला वाचवण्यासाठी अनेक राडकारण्यांची आणि मंत्र्यांची मदत घेतली, पण डीआरआयकडे भक्कम पुरावे होते, ज्यामुळे कोणताही राजकीय दबाव तिला याप्रकरणातून वाचवू शकला नाही. आणि तिला ताब्यात घेण्यात आलं.
Sponsored Links by Taboola