Ranveer Singh : रणवीर सिंहची स्टाईल उर्फी जावेद सारखी? अतरंगी लूकमुळे रणवीर ट्रोल..
(photo:ranveersingh/ig)
1/7
Ranveer Singh : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) चित्रपटांमधील अभिनयाबरोबरच त्याच्या वेगवेगळ्या अतरंगी लूकमुळे देखील चर्चेत असतो. (photo:ranveersingh/ig)
2/7
त्याच्या अतरंगी लूकला त्याच्या चाहत्यांची पसंती मिळते तर काही नेटकरी त्याला ट्रोल देखील करतात. रणवीरचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमधील त्याच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले. रणवीरच्या या आऊटफिटची किंमत ऐकून तुम्ही देखील थक्क व्हाल. (photo:ranveersingh/ig)
3/7
रणवीरच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तो Gucci या ब्रँडनं डिझाइन केलेल्या आऊट-फिटमध्ये दिसत आहे. व्हिडीओमध्ये रणवीर पिंक कलरचे प्रिंटेड आऊट- फिट आणि पायात रंगीत शूज अशा लूकमध्ये दिसत आहे. (photo:ranveersingh/ig)
4/7
रिपोर्टनुसार, रणवीरनं घातलेल्या या प्रिंटेड आऊट फिटची किंमत जवळपास एक लाख रूपये आहे. तसेच त्याने घातलेल्या शूजची किंमत 68,000 हजार आहे.(photo:ranveersingh/ig)
5/7
रणवीरच्या या व्हायरल व्हिडीओला कमेंट करून अनेकांनी त्याला ट्रोल केले आहे. एका युजरनं कमेंट केली, 'हा किचनमध्ये वापरायचा ड्रेस आहे.' तर दुसऱ्यानं कमेंट केली, 'याची स्टाईल उर्फी जावेद सारखी आहे.' एक नेटकरी म्हणाला, 'पडदे शिवायला ज्या कापडाचा वापर करतात, ते कापड वापरून हा ड्रेस शिवला आहे असं वाटतं' (photo:ranveersingh/ig)
6/7
रणवीरचा लवकरच जयेशभाई जोरदार हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. (photo:ranveersingh/ig)
7/7
तसेच रोहित शेट्टीच्या सर्कस या चित्रपटामध्ये देखील रणवीर प्रमुख भूमिका साकारणार आहे. (photo:ranveersingh/ig)
Published at : 11 Mar 2022 02:10 PM (IST)