Riddhima Kapoor : 'या' कारणामुळे रणबीरची बहिण रिद्धिमा अभिनय क्षेत्रापासून दूर राहिली!
ridhima kapoor
1/6
अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) यांचाविवाहसोहळा पार पडला. परंतु, या विवाह सोहळ्यासोबतच रणबीरची बहीण रिद्धिमा चर्चेत आली आहे. (photo:riddhimakapoorsahniofficial/ig)
2/6
रिद्धिमा पहिल्यांदा 13 एप्रिल रोजी मेहंदी फंक्शनमध्ये वास्तु अपार्टमेंटमध्ये जाताना दिसली होती. सिल्व्हर कलरच्या साडीत ती खूपच सुंदर दिसत होती. रिद्धिमा खूप स्टायलिश आहे. (photo:riddhimakapoorsahniofficial/ig)
3/6
शिवाय दिसायलाही ती खूप सुंदर आहे. परंतु, ती एकाही चित्रपटामध्ये दिसली नाही. (photo:riddhimakapoorsahniofficial/ig)
4/6
रिद्धिमाने बॉलिवूडमध्ये कधीही रस दाखवला नाही. शिवाय ती प्रसिद्धीपासून कायमच दूर राहिली. एका मुलाखतीत स्वत: रिद्धिमानेच याचे कारण सांगितले होते. "मी 16-17 वर्षांची असताना लंडनमध्ये शिकत होते. त्यावेळी मला चित्रपटांमध्ये काम करण्याच्या अनेक ऑफर्स आल्या. परंतु, मी त्या कधीच गांभीर्याने घेतल्या नाहीत. आई नीतू कपूर यांनाही मी याबाबत सांगितले होते. परंतु, इतक्या लहान वयात चित्रपटात पदार्पण करू नये असे आईला वाटत होते." (photo:riddhimakapoorsahniofficial/ig)
5/6
रिद्धिमा सांगते, "लंडनमधील शिक्षण पूर्ण करून भारतात परत आले. भारतात परत येताच माझे लग्न झाले. मी चित्रपटांमध्ये काम केले असते तर लोक म्हणाले असते की, आई-वडील आणि कुटुंबातील अनेक सदस्य चित्रपटात आहेत." (photo:riddhimakapoorsahniofficial/ig)
6/6
रणबीर, करिश्मा आणि करीना हे सर्व जण स्टार किड्स आहेत.या सर्वांचे यश हे त्यांच्या टॅलेंटच्या जोरावर आहे. हे सर्वच जण त्यांच्या कामात निष्णात असल्यामुळे त्यांना सुपरस्टार मानले जाते. रिद्धिमा एक ज्वेलरी डिझायनर आहे. ती पती भरत साहनी आणि मुलगी समारासोबत दिल्लीत राहते. (photo:riddhimakapoorsahniofficial/ig)
Published at : 15 Apr 2022 04:41 PM (IST)