रणबीर कपूरचा भाऊ आदर जैनचं शाही थाटात लग्न, गोव्याच्या किनारी अडकला लग्नबंधनात, बायको नेमकी कोण?
रणबीर कपूरचा आतेभाऊ आदर जैन याचं गोव्याच्या किनाऱ्यावर शाही थाटात लग्न पार पडलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appख्रिश्चन पद्धतीने हा लग्नसोहळा पार पडला आहे. यावेळी संपूर्ण कपूर कुटुंबीय उपस्थित होते.
आदर जैनच्या पत्नीचं नाव आलेखा आडवाणी असे आहे. गेल्या बऱ्याच दिवसांपासून ते रिलेशनशीपमध्ये होते.
आदर आणि आलेखा यांच्या लग्नसोहळ्याचे फोटो अभिनेत्री करिना कपूर आणि अभिनेत्री नितू कपूर यांनी आपल्या इ्न्स्टाग्रामच्या खात्यावर पोस्ट केले आहेत.
गेल्या वर्षाच्या सप्टेंबर महिन्यात या दोघांचा साखरपुडा झाला होता. साखरपुड्यानंतर आलेखाने आपल्या इन्स्टाग्राम खात्यावर फोटो पोस्ट केले होते.
आदर जैन हा रिमा जैन यांचा मुलगा आहे. तर रिमा जैन या दिवंगत अभिनेते राज कपूर यांच्या कन्या आहेत.
रिमा जैन या रणबीर कपूर, करिश्मा कपूर, करीना कपूर यांची आत्या आहे. आदर जैन हा म्हणजेच रणबीर, करिश्मा आणि करीना यांचा आतेभाऊ आहे.
आदर जैन हा याआधी तारा सुतारिया हिच्यासोबत रिलेशनशीपमध्ये होता. नंतर त्याच्या आयुष्यात आलेखा आडवाणी आली. आलेखा आडवाणी ही वे वेल (Way Well) या कंपनीची संस्थापक आहे.
आदर जैन आणि आलेखा आडवाणी
आदर जैन आणि आलेखा आडवाणी
आदर जैन आणि आलेखा आडवाणी