Happy Birthday Rana Daggubati : जाणून घ्या 'बाहुबली' फेम राणा डग्गुबातीबाबत खास गोष्टी

Rana Daggubati

1/7
बाहुबली चित्रपटातून प्रसिद्धी मिळालेला अभिनेता म्हणजेच राणा डग्गुबाती. आज राणाचा 37वा वाढदिवस आहे. त्याचा जन्म 14 डिसेंबर 1984 रोजी झाला होता.
2/7
राणा डग्गुबाती दक्षिणात्य सिनेसृष्टीतला सूपरस्टार आहे. एक उत्कृष्ट अभिनेत्यासह तो उत्तम फोटोग्राफरही आहे. त्याचे वडील सुरेश बाबू तेलगू चित्रपटांचे दिग्दर्शक आहेत.
3/7
राणा उजव्या डोळ्याने पाहू शकत नाही. लहानपणी त्याचा उजवा डोळा निकामी झाल्याने त्याला डोळा कोणीतरी दान केला होता. मात्र त्यामध्ये काही त्रुटींमुळे राणाला एका डोळ्याने दिसत नाही.
4/7
एका कार्यक्रमादरम्यान राणा म्हणाला होता की, 'मला उजव्या डोळ्याने दिसत नाही. मी फक्त माझ्या डाव्या डोळ्याने पाहतो. मी माझा डावा डोळा बंद केला तर मला काहीही दिसत नाही.''
5/7
राणाने कोनिक इन्स्टिट्यूट ऑफ इमेजिंग अँड टेक्नॉलॉजीमधून फोटोग्राफीचा कोर्स केला आहे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी चेन्नईमध्ये अनेक माहितीपट आणि जाहिरातींचे दिग्दर्शन केले.
6/7
त्यानंतर तो हैदराबादला आला आणि वडिलांचे प्रोडक्शन हाऊस सांभाळू लागला. राणाने 2010 मध्ये 'लीडर' या पॉलिटिकल थ्रिलर चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली.
7/7
राणा डग्गुबातीला खरी प्रसिद्धी 'बाहुबली' चित्रपटातील 'बल्लाळदेव' या भूमिकेतून मिळाली.
Sponsored Links by Taboola