राजमहालापेक्षा कमी नाही 'या' साऊथ सुपरस्टारचं घर; Inside फोटो पाहून डोळे दिपतील PHOTOs

Ram Charan Inside Photos Of House: लोकप्रिय दक्षिणात्य अभिनेता राम चरण त्याच्या कुटुंबासह लग्झरी लाईफ जगतो. अभिनेता ज्या घरात राहतो, ते घर एखाद्या राजवाड्यासारखं आहे.

Continues below advertisement

Ram Charan Inside Photos Of House

Continues below advertisement
1/8
राम चरणचं कुटुंब बहुतेकदा प्रसिद्धीपासून दूर राहते. पण अलीकडेच त्याची पत्नी उपासना हिनं चाहत्यांना त्यांच्या आलिशान घराची झलक दाखवली. हे फोटो पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
2/8
आज राम चरण केवळ दाक्षिणात्य सिनेसृष्टीतच नव्हे तर भारतीय चित्रपट उद्योगातही एक मोठं नाव बनलंय. राम चरण त्याच्या कुटुंबासह लग्झरी लाईफ आलिशान जीवनशैलीचा आनंद घेतो.
3/8
अभिनेत्याची पत्नी उपासना कोनीडेला बिजनेसवुमन आहे. अलीकडेच तिनं तिच्या शाही घराची झलक चाहत्यांना सादर केली. या फोटोंमध्ये अभिनेत्याच्या घराचं सौंदर्य पाहून तुमचे डोळे दिपतात.
4/8
हा अभिनेता आपलं वैयक्तिक आयुष्य प्रसिद्धीपासून दूर ठेवणं पसंत करतो. पण आता जेव्हा त्याच्या घराची झलक जगासमोर आली आहे, तेव्हा चाहते हे पाहून आश्चर्यचकित झाले आहेत. राम चरणचे घर एखाद्या राजवाड्यापेक्षा कमी नाही.
5/8
अलीकडेच, कर्ली टेल्सला दिलेल्या मुलाखतीत, अभिनेत्याच्या पत्नीनं तिच्या घराचा प्रत्येक कोपरा दाखवला. अभिनेत्याचं कुटुंब तेलंगणातील कोनिडेला हाऊसमध्ये राहते. इथे राम चरण त्याच्या पत्नी, मुलं आणि कुटुंबातील इतर सदस्यांसह राहतो.
Continues below advertisement
6/8
घराचं इंटीरियर अँटीक डिझाइननं बनवलं आहे. अँटीक इंटीरियरसोबतच, त्याला आधुनिक टच देखील देण्यात आला आहे, जो संपूर्ण घराचा लूक आणखी वाढवतो. अभिनेत्याच्या या आलिशान बंगल्यात, तुम्हाला निसर्गासह आलिशान इंटीरियरचं अद्भुत मिश्रण पहायला मिळेल.
7/8
यासोबतच, घराच्या डेकोरेशनमध्ये तुम्हाला अनेक प्राचीन वस्तू देखील पाहायला मिळतील. अभिनेत्याच्या घरात दाक्षिणात्य टच दिसून येतो. राम चरणचं घर झाडाझुडुपांनी वेढलेलं आहे, ज्यामुळे घराभोवती हिरवळ पसरलेली दिसते.
8/8
घराच्या अंगणापासून जेवणाच्या जागेपर्यंत आरामदायी फर्निचर ठेवलेलं आहे. उपासना मुलाखतीदरम्यान म्हणाली की, ती लग्नानंतर या घरात आली होती आणि हे घर तिच्यासाठी व्हेकेशन हाऊस आहे.
Sponsored Links by Taboola