In Pics : तू रंग शरबतों का... रकुल प्रीत सिंहचा फंकी कॅज्युअल अंदाज!
Rakul Preet Singh
1/6
रकुल प्रीत स्टायलिश डिझायनर मल्टी-कलर ओव्हरसाईज ब्लेझर आणि ब्लू बूटकट पॅंटमध्ये तिचा आगामी चित्रपट ‘रनवे 34’चे प्रमोशन करताना दिसली. यादरम्यान तिच्या स्टाईलवर साऱ्यांच्याच नजर खिळल्या होत्या.
2/6
रकुल प्रीत तिच्या आगामी थ्रिलर चित्रपट ‘रनवे 34’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. ज्यात ती अजय देवगण आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबत झळकणार आहे. 21 मार्च रोजी या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला.
3/6
या प्रमोशनवेळी रकुल प्रीतने बूटकट ब्लू पँट आणि मल्टीकलर ब्लेझर घातला होता, जो तिच्यावर चांगला दिसत होता.
4/6
रकुल प्रीतने ओव्हरसाईज ब्लेझर घालून आणि स्लीव्हज वर करून तिचा लूक थोडासा कॅज्युअल ठेवला होता.
5/6
सोशल मीडियावर फोटो शेअर करताना रकुल प्रीतने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘हा रंगतदार दिवस आहे #runway34 ट्रेलर आऊट.’
6/6
अभिनेत्री रकुल प्रीत सिंहचा हा पोशाख फॅशन डिझायनर तानाज फातिमा एम. चर्नीच्या कलेक्शनमधला आहे. (Photo : @rakulpreet/IG)
Published at : 22 Mar 2022 05:09 PM (IST)