Rakhi Sawant on Marriage: 'एकाच दुकानातून शॉपिंग करता का? 3-4 वेळा लग्न करणं नॉर्मल', राखी सावंत काय म्हणाली? 2 वेळा घटस्फोट होऊनही...
Rakhi Sawant on Marriage: राखी सावंत लग्नाबाबत नेमकं काय म्हणाली?
Continues below advertisement

Rakhi Sawant on Marriage
Continues below advertisement
1/8
एंटरटेनमेंट क्वीन राखी सावंत आपल्या बेधडक वक्तव्यांसाठी ओळखली जाते. राखीने आपल्या आयुष्यात बरेच चढ उतार पाहिले आहेत. पण तिने आयुष्य जगणं कधी सोडून नाही दिलं.
2/8
राखी सावंतचं 2 वेळा घटस्फोट झाला आहे. तरी देखील अभिनेत्री कायम पॉझिटिव्ह राहते. राखीने लग्न आणि सिंगल मदर राहण्यासाठी आपलं मत मांडलं आहे.
3/8
एका पॉडकास्टमध्ये अभिनेत्रीला सिंगल मदर होण्यावर प्रश्न विचारण्यात आला, 'सिंगल मदर होणं अवघड आहे का?' असा प्रश्न विचारण्यात आला.
4/8
तेव्हा अभिनेत्रीने उत्तर दिलं, नाही. राखी म्हणाली, 'आजच्या जमान्यात ही बाब जास्त अवघड नाही. सिंगल मदर म्हणजे काय? स्वतः कमवा आणि आपल्या मुलाचाही सांभाळ करा'.
5/8
'जर कुणी चांगला मुलगा मिळाला तर मी नक्कीच लग्नाचा विचार करेन', असं राखी म्हणाली.
Continues below advertisement
6/8
राखी आपल्या अंदाजात म्हणाली की, 'आजकाल प्रेम पण करा आणि लग्नही करा. 3-4 वेळा लग्न होणं हे नॉर्मल झालं आहे', असं अभिनेत्री म्हणाली.
7/8
'जेव्हा तुम्ही शॉपिंग करता, तेव्हा तुम्ही एकाच दुकानातून शॉपिंग करता का? जाता ना दुसऱ्या दुकानात. आजकाल लग्न देखील शॉपिंगप्रमाणे झालं आहे', असं अभिनेत्री म्हणाली.
8/8
दरम्यान, तिची ही मुलाखत सोशल मीडियात व्हायरल होत आहे. नेटकरी विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत.
Published at : 09 Aug 2026 08:03 PM (IST)