Rajinikanth Birthday : बस कंडक्टर ते 'सुपरस्टार', थलैवा रजनीकांत यांचा भन्नाट प्रवास
सुपरस्टार रजनीकांत यांचा आज वाढदिवस आहे. आपल्या अदाकारीनं त्यांनी चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलंय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरजनीकांत यांचा जन्म 12 डिसेंबर 1950 रोजी बंगळुरूमधील एका मराठी कुटुंबात झाला. रजनीकांत यांचं खरं नाव शिवाजीराव गायकवाड आहे. एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या रजनीकांत यांनी परिश्रम व धडपडीमुळे केवळ टॉलीवूडमध्येच नव्हे तर बॉलिवूडमध्येही आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. दक्षिणेस रजनीकांत यांना थलायवा आणि देव मानलं जातं.
घरची आर्थिक स्थिती बिकट असल्याने रजनीकांत यांनी सुरुवातीच्या काळात बंगळुरु ट्रान्सपोर्ट सर्विसेसमध्ये कंडक्टरची नोकरी केली. मात्र आपल्यात इतरांपेक्षा वेगळी असल्याचं त्यांना जाणवलं आणि त्यांनी नोकरी सोडून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं.
त्यानंतर रजनीकांत 1974 साली मद्रास फिल्म इन्स्टिट्युटमध्ये दाखल झाले. कन्नड बोलणाऱ्या रजनीकांत यांनी तमिळ भाषाही शिकली.
रजनीकांत यांनी 1975 पहिला तमिळ चित्रपट 'अपूर्वा रागनगाल' हा होता. या सिनेमात त्यां सपोर्टिंग अॅक्टर म्हणून काम केलं. मुख्य भूमिकेत 'भैरवी' हा त्यांचा पहिला तमिळ चित्रपट होता. चित्रपट हिट ठरला आणि तिथून रजनीकांत यांचा सुपरस्टार पर्यंतचा प्रवास सुरु झाला.
त्यानंतर‘अंधा कानून’ चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. बॉलिवूडमध्येही आपल्या दमदार अभिनय आणि वेगळ्या स्टाईलच्या जोरावर त्यांना लोकांची मनं जिंकली.