Pushpa 2 Box Office Collection Worldwide: बॉक्स ऑफिसवर 'पुष्पा 2'ची धुवांधार कमाई; तरी 'या' ब्लॉकबस्टर फिल्म्सपेक्षा मागेच
पुष्पा 2 ला जगभरातील प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं. यासह हा चित्रपट जागतिक बॉक्स ऑफिसवर राज्य करत आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊन दोन आठवडे होत आले असले, तरी त्याची क्रेझ प्रेक्षकांमधून कमी होत नाहीये. यासोबतच त्यानं जगभरात रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. तरीही तो काही चित्रपटांच्या तुलनेत खूप मागे आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुष्पा 2 जागतिक बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या ॲक्शन थ्रिलरनं आतापर्यंत जगभरात 1400 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे, जेव्हा तुम्ही त्याचं यूएस डॉलरमध्ये रूपांतर करता तेव्हा ते 16 दशलक्ष डॉलर होतात.
दरम्यान, अल्लू अर्जुनचा हा चित्रपट 2024 च्या अनेक मेगा-ब्लॉकबस्टरला मागे टाकण्यात यशस्वी ठरला नाही. या यादीत कोणत्या चित्रपटांचा समावेश आहे, ते सविस्तर जाणून घेऊया...
डेडपूल फ्रँचायझीचा तिसरा हप्ता, डेडपूल आणि वॉल्व्हरिनचे रेकॉर्ड तोडण्यात पुष्पा 2 खूप मागे आहे. हा चित्रपट 200 दशलक्ष डॉलर्सच्या अंदाजे बजेटसह बनवला गेला आणि बॉक्स ऑफिसवर 1.338 दशलक्ष डॉलर्स कमावले.
पुष्पा 2 इनसाइड आउटमध्ये खूप मागे आहे. या चित्रपटाची निर्मिती 200 दशलक्ष डॉलर्स बजेटमध्ये झाली आणि 1.699 दशलक्ष डॉलर्स कमावले. यासह, हा 2024 चा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.
ॲनिमेटेड चित्रपट, डेस्पिकेबल मी 4, 100 दशलक्ष डॉलर्स बजेटमध्ये बनवला गेला आणि त्यानं 969 दशलक्ष डॉलर्स कमावले. पुष्पा 2 हा चित्रपटही खूप मागे आहे.
डायस्टोपियन साय-फाय ॲडव्हेंचर ड्युन पार्ट 2 190 दशलक्ष डॉलर्सच्या बजेटमध्ये तयार केलं गेलं होतं आणि जगभरात 714 दशलक्ष डॉलर्स कमावले आहेत.
आणखी एक ॲनिमेटेड फिचर्सनं जगभरातील बॉक्स ऑफिस कमाईच्या बाबतीत पुष्पा 2 ला मागे टाकले, 159 दशलक्ष डॉलर्सच्या बजेटमध्ये तयार करण्यात आलेल्या Moana 2 नं जगभरात 599 दशलक्ष डॉलर्स कमावले आहेत.