PHOTO: बॉलिवूडसह हॉलिवूड गाजवणाऱ्या प्रियंकाचा देसी गर्ल अवतार; फोटो चर्चेत!
वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी मिस इंडियाचा किताब आपल्या नावे करत प्रियंका रातोरात सुपरस्टार झाली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमेहनतीच्या जोरावर अभिनेत्रीने बॉलिवूडसह हॉलिवूडमध्ये आपलं विशेष स्थान निर्माण केलं आहे. आजवर तिने 80 पेक्षा अधिक सिनेमे आणि सीरिजमध्ये काम केलं आहे.
2000 मध्ये मिस इंडियाचा किताब पटकावल्यानंतर तिने 'साजन मेर सतरंगिया' या लघुपटाच्या माध्यमातून अभिनयक्षेत्रात पाऊल ठेवलं. त्यानंतर 'थमिजाह' हा सिनेमा तिने केला. 2003 मध्ये आलेल्या 'द हीरो: लव्ह स्टोरी ऑफ अ स्पाई' या सिनेमात ती महत्त्वाच्या भूमिकेत दिसली. पण 'अंदाज' या सिनेमाच्या माध्यमातून ती खऱ्या अर्थाने लोकप्रिय झाली.
'अंदाज' सिनेमाच्या यशानंतर प्रियंका चोप्राने कधीच मागे वळून पाहिलं नाही. प्लॅन, किस्मत, असंभव सारख्या सिनेमांत तिने काम केलं. 2005 मध्ये आलेला 'मुझसे शादी करोगी' या सिनेमातील प्रियंकाच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.
तिचा हा सिनेमा सुपरहिट ठरला. 2016 साली प्रियंकाने हॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. प्रियंका चोप्रा हॉलिवूडमध्ये मुख्य भूमिका करणारी पहिली बॉलिवूड नायिका ठरली.
देसी गर्ल प्रियांका सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. कायम ती तिचे फोटो व्हिडियो शेअर करत असते.
प्रियांकाचा एक लूक सध्या व्हायरल होतोय. ज्यात ती तिच्या आयकॉनिक देसी गर्ल लूकमध्ये दिसत आहे.
प्रियांकाने यात निऑन ग्रीन रंगाची साडी नेसली आहे. ज्यात ती खूपच सुंदर दिसत आहे.
प्रियंका चोप्रा 2018 मध्ये निक जोनाससोबत लग्नबंधनात अडकली. सध्या ती पतीसोबत आणि लेक मालतीसोबत अमेरिकेत आहे.
हॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतरही प्रियंका बॉलिवूड गाजवत आहे. 2021 मध्ये आलेल्या 'व्हाइट टायगर' सिनेमातील प्रियंकाच्या दमदार अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती.