प्रियांका चोप्रा निक जोनाससोबत झाली रोमँटिक; दोघांचे रूममधील 'इनसाईड' फोटो व्हायरल
Priyanka Chopras Romantic Post With Nick Jonas: प्रियांका चोप्राची निक जोनाससाठी भावनिक आणि रोमँटिक पोस्ट. फोटो सोशल मीडियात व्हायरल.

Priyanka Chopras Romantic Post With Nick Jonas
1/9
बॉलिवूडच्या देसी गर्लने हॉलिवूडमध्येही आपला डंका वाजवला. तिनं आपल्या अभिनयातून आणि गायनातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. प्रियांका बॉलिवूडपासून काही काळ दूर होती, पण तिची चर्चा काही कमी झाली नाही.
2/9
प्रियांका केवळ कामासाठी नसून, तिच्या वैयक्तिक कारणांमुळेही चर्चेत असते. तिचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होतात.
3/9
प्रियांका सध्या परदेशात आपल्या कुटुंबासह खूप खुश आहे. पती निक जोनस आणि मुलगी मालती मेरी चोप्रासोबत बऱ्याचदा टाइम स्पेंड करताना दिसते.
4/9
प्रियांका आणि निक जोनासचे अनेक रोमँटिक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होतात. या फोटोंमधून दोघांचे एकमेकांप्रति प्रेम आणि आदर ठळकपणे दिसून येते.
5/9
अलिकडेच प्रियांका चोप्राने समाजमाध्यमांवर एक पोस्ट शेअर केली. या फोटोंमधून दोघांचं सुंदर बॉन्ड स्पष्टपणे दिसून येत आहे.
6/9
काही फोटोंमध्ये प्रियांका चोप्रा निक जोनासच्या मिठीत दिसते. तर, काही फोटोंमध्ये दोघांचा स्वॅग अवतार दिसतो. तर, काही फोटोंमधून दोघे सहलीचा आनंद घेत असल्याचं दिसून येत आहे.
7/9
तर, पोस्टमधील एका फोटोमध्ये निक जोनासच्या जवळ त्यांची मुलगी मालती खेळत असल्याचं दिसून येत आहे. प्रियांकाने ही पोस्ट शेअर करून सुंदर आणि भावनिक कॅप्शन दिलं आहे.
8/9
"तुम्ही खूप प्रामाणिक व्यक्ती आहात. मी खुश राहण्यामागचं कारण तुम्ही आहात. निक जोनाससारखा जोडीदार मिळणं हे माझं भाग्य आहे. हे फोटो सुरूवातीच्या काळातील आहेत, पण मी हे क्षण काल जगले असं वाटत आहे. मी तुमच्यावर प्रचंड प्रेम करते", असं तिनं कॅप्शनमध्ये म्हटलंय.
9/9
प्रियांकाची ही पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या पोस्टवर निक जोनासने देखील कमेंट केली आहे. 'My Everything', अशी कमेंट केली आहे. या पोस्टमधून दोघांमधील प्रेम ठळकपणे दिसून येत आहे.
Published at : 08 Feb 2026 06:24 PM (IST)