संजय कपूर यांच्या मृत्यूनंतर 30 हजार कोटींच्या संपत्तीचा वाद, पत्नी अन् आईमध्ये वादाची ठिणगी
प्रिया सचदेव, संजय कपूर यांच्या निधनानंतर 30,000 कोटींच्या संपत्तीच्या वादात अडकली असून, ती एक यशस्वी बिझनेसवुमन आहे आणि सोना कॉमस्टारची नॉन-एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आहे.
Sanjay Kapoor Death
1/8
करिश्मा कपूर यांच्याशी घटस्फोट झाल्यानंतर संजय कपूर यांनी प्रिया सचदेवशी लग्न केलं. प्रिया ही एक मॉडर्न आणि बिझनेस वूमन आहे. संजय कपूर यांच्या निधनानंतर 30,000 कोटींच्या मालमत्तेच्या वादामुळे ती चर्चेत आली.
2/8
प्रिया सचदेव कपूरने काही काळ जाहिरात आणि बॉलिवूडमध्ये काम केलं आहे. संजय कपूर यांचा इंग्लंडमध्ये पोलो मॅचदरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यांच्या निधनानंतर एक महिन्याने, त्यांच्या आई राणी कपूर यांनी सोना कॉमस्टार कंपनीच्या बोर्डाला एक पत्र लिहिलं.
3/8
राणी कपूर यांनी आपल्या पत्रात आरोप केला आहे की, संजयच्या मृत्यूनंतर काही लोकांनी तिला जबरदस्तीने कागदपत्रांवर स्वाक्षरी करवून घेतली. तसंच, काही लोकांनी खोटं सांगून कुटुंबाचे प्रतिनिधी असल्याचा दावा केला, आणि हा आरोप थेट प्रिया सचदेववर असल्याचं सूचित होतं.
4/8
'सोना बीएलडब्ल्यू प्रेसिजन फोर्जिंग्ज लिमिटेड' कंपनीने राणी कपूरांचे आरोप फेटाळले आहेत आणि सांगितले की त्या कंपनीच्या शेअरहोल्डर नाहीत. कंपनीने हेही स्पष्ट केलं की त्यांनी सगळं काम कायदेशीर सल्ल्यानुसार केलं आहे.
5/8
प्रिया सचदेव कपूरचा जन्म दिल्लीत ऑटोमोबाईल डीलर अशोक सचदेव यांच्या घरी झाला. तिने युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन (UCL) मधून गणित आणि बिझनेस मॅनेजमेंटचं शिक्षण घेतलं आणि ucla मध्येही अभ्यास केला. लंडनमध्ये एका कंपनीत काम सुरू केल्यानंतर ती भारतात परतली.
6/8
प्रियाची कारकीर्द खूपच यशस्वी राहिली आहे. तिने ऑटोमोबाईल रिटेल, विमा, फॅशन आणि लक्झरी ई-कॉमर्स क्षेत्रात काम केलं आहे. तिने भारतातील पहिल्या प्रीमियम शॉपिंग पोर्टल्सपैकी एक असलेल्या 'रॉक एन शॉपची' सुरुवात केली होती.
7/8
सध्या प्रिया सोना कॉमस्टार कंपनीत नॉन-एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून काम करते. ती कपूर कुटुंबाची 'ऑरियस इन्व्हेस्टमेंट' नावाची फर्म चालवते आणि 'ऑरियस पोलो टीमचे’ नेतृत्व करते
8/8
प्रियाच्या वैयक्तिक आयुष्याकडेही माध्यमांचे लक्ष राहिले आहे. तिचं पहिलं लग्न अमेरिकन हॉटेल व्यवसायिक विक्रम चटवालशी झालं होतं आणि त्यांच्यापासून तिला एक मुलगी आहे. घटस्फोटानंतर, 2017 मध्ये तिने संजय कपूरशी लग्न केलं. प्रियाला आणि संजयला एक मुलगा आहे.
Published at : 29 Jul 2025 04:01 PM (IST)