'मराठी पाऊल पडते पुढे’ पुरस्काराची मानकरी झाली 'प्रिया बापट'.
नुकत्याच पार पडलेल्या 'झी चित्र गौरव पुरस्कार' (Zee Chitra Gaurav Awards) सोहळ्यात अभिनेत्री प्रिया बापट (Priya Bapat) हिला मराठी पाऊल पडते पुढे हा पुरस्कार देण्यात आला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appप्रिया बापट यांना यंदाचा झी मराठी चित्रगौरव २०२४ 'मराठी पाऊल पडते पुढे' पुरस्कार जाहीर
या गौरव सोहळ्यात यंदा महिला कलाकारांचा गौरव केला जाणार आहे.
या पुरस्कार सोहळ्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे 'मराठी पाऊल पडते पुढे’ पुरस्कार, ह्यावर्षी या पुरस्काराची मानकरी ठरली ती म्हणजे 'प्रिया बापट'.
तिनं बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं.
तिनं ‘नवा गडी नवं राज्य’ , ‘दादा,एक गुड न्यज आहे’ आणि ‘जर तर ची गोष्ट’ अशी तिन नाटकं अभिनेत्री आणि निर्माती ह्या भूमिकेतून अत्यंत यशस्वीपणे सांभाळली.
मराठी मालिका, मराठी नाटक, मराठी चित्रपट , हिंदी चित्रपट , हिंदी वेबसिरीज, जाहिरात, अभिनय, निर्माती अशा अनेक क्षेत्रात तिचा वावर सातत्यपूर्ण आणि दर्जेदार आहे.