PHOTO: आलिया भट्टच्या चेहऱ्यावर दिसला प्रेग्नेंसी ग्लो, पाहा नवे फोटो!
बॉलिवूडची 'गंगूबाई' अर्थात आलिया भट्टने नुकतीच तिच्या प्रेग्नेंसीची बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांसोबत शेअर केली आहे. (photo:aliaabhatt/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतिच्या गरोदरपणाची बातमी ऐकून चाहते खूप खूश आहेत आणि तिला शुभेच्छा देत आहेत. आलियाने नुकतेच सोशल मीडियावर आणखी काही फोटो शेअर केले आहेत, जे मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. (photo:aliaabhatt/ig)
या फोटोंवर यूजर्स भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. आलिया कपूर, रणबीर कपूर आणि त्यांच्या आगामी बाळाबद्दलचे प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात.(photo:aliaabhatt/ig)
आलिया भट्टने तिचे तीन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. एका चित्रात ती हसताना दिसत आहे, तर दुसऱ्या चित्रात तिची सावली दिसत आहे.(photo:aliaabhatt/ig)
तिसर्या फोटोत आलियाने तिच्या आजूबाजूचे दृश्य दाखवले आहे, जिथे ती फिरत आहे. चाहत्यांसोबतच अनेक स्टार्सनीही आलियाच्या या पोस्टवर लाईक आणि कमेंट केल्या आहेत आणि तिला स्वतःची काळजी घेण्यास सांगितले आहे.(photo:aliaabhatt/ig)
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर आलिया भट्टच्या आगामी चित्रपटांची यादी बरीच मोठी आहे. रणबीर-आलिया पहिल्यांदाच 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात एकत्र दिसणार आहेत.(photo:aliaabhatt/ig)