प्रजक्ताच्या कॅप्शननं वेधलं अनेकांचे लक्ष; पाहा फोटो!
(photo: prajakta_official/ig)
1/6
मराठी मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी अभिनेत्री प्रजक्ता माळी (Prajakta Mali) तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत असते. (photo: prajakta_official/ig)
2/6
काल (2 एप्रिल) शिवाजी पार्क येथे मनसेचा गुढीपाडवा मेळावा पार पडला. यावेळी राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केलेल्या भाषणाचा व्हिडीओ प्राजक्तानं सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडीओला प्रजक्तानं दिलेल्या कॅप्शननं अनेकांचे लक्ष वेधलं. (photo: prajakta_official/ig)
3/6
मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यातील व्हिडीओ शेअर करून प्राजक्तानं कॅप्शनमध्ये लिहिले, 'नाही नाही..कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश केला नाही. काल आयूष्यात पहिल्यांदा राजकीय सभा अनुभवली (खूप दिवसांपासून अनुभवायचीच होती..) ते फक्त तुमच्याबरोबर share करतेय…,इतकाच हेतू. कलाकार नंतर आधी मी माणूस- सामाजिक प्राणी आहे; त्याच्या समृद्धी करता पण झटायला हवं. जसं फिल्मफेअर जाणं गरजेचं तसच हेही.., म्हणून हा घाट. ( After all आता माझ्या आधार कार्ड वर मुंबईचा पत्ता आहे.)'(photo: prajakta_official/ig)
4/6
वेगवेगळ्या विषयांवरील पोस्ट प्राजक्ता सोशल मीडियावर शेअर करत असते.(photo: prajakta_official/ig)
5/6
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमामधून देखील प्राजक्ता प्रेक्षकांच्या भेटीस येते.(photo: prajakta_official/ig)
6/6
तसेच काही महिन्यांपूर्वी लकडाऊन हा प्राजक्ताचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. प्राजक्ताबरोबरच या चित्रपटामध्ये अभिनेता अंकुश चौधरीनं देखील प्रमुख भूमिका साकारली होती.(photo: prajakta_official/ig)
Published at : 03 Apr 2022 04:51 PM (IST)