Prajakta Mali : प्राजक्ता माळी ठरली 'कमला रायझिंग स्टार' पुरस्कारची मानकरी; पोस्ट शेअर करून दिली माहिती
Prajakta Mali
1/9
मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेत्री प्रजक्ता माळी तिच्या अभिनयाने आणि नृत्यानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते.(Prajakta Mali/ Instagram)
2/9
प्राजक्तानं नुकतीच एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली(Prajakta Mali/ Instagram)
3/9
पोस्टमधून प्राजक्तानं तिला मिळालेल्या पुरस्काराची माहिती दिली. पुरस्कार सोहळ्यातील फोटो प्राजक्ताने शेअर केले आहेत. (Prajakta Mali/ Instagram)
4/9
पुरस्कार सोहळ्यातील फोटो शेअर करून त्याला कॅप्शन दिलं, 'आणि कालच्या शुभमुहूर्तावर “मुंबई- राजभवनात” जाण्याचा योग आला. काल महाराष्ट्राचे राज्यपाल - मा. श्री. भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते 'कमला रायझिंग स्टार' पुरस्कार मिळाला.'(Prajakta Mali/ Instagram)
5/9
'प्रेक्षकांच्या प्रेमाचं परिवर्तन अशा पुरस्कारांमध्ये होतं असं मला वाटतं, त्यामुळे सर्व प्रेक्षकांचे देखील मनापासून आभार. असच प्रेम राहू द्या.' असंही प्राजक्तानं पोस्टमध्ये लिहिलं (Prajakta Mali/ Instagram)
6/9
फोटोमध्ये प्राजक्ताची आई देखील दिसत आहे. प्राजक्तानं तिच्या आईचा आणि अभिनेता आकाश ठोसरचा फोटो शेअर केला आणि त्याबाबत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, 'आई आणि भाऊ या सोहळ्यासाठी खास पुण्याहून आले होते, फोटो काढायचा राहिला, आईने आकाश बरोबर आवर्जून काढला.. चालायचं'(Prajakta Mali/ Instagram)
7/9
प्राजक्तासोबतच अमित त्रिवेदी, प्रतिक गांधी,शेफ रणवीर ब्रार, बिझनेस वूमन अनन्या बिर्ला, धर्मेश आणि आकाश ठोसर यांना देखील हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. (Prajakta Mali/ Instagram)
8/9
सध्या 'महाराष्ट्राची हास्य जत्रा' या कार्यक्रमाचे प्राजक्ता सूत्रसंचालन करत आहे. (Prajakta Mali/ Instagram)
9/9
काही दिवसांपूर्वी प्राजक्ताचा लक-डाऊन हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.(Prajakta Mali/ Instagram)
Published at : 05 May 2022 12:54 PM (IST)