Prajakta Gaikwad: प्राजक्ता गायकवाडचा मराठमोळा लूक; चाहते घायाळ!
मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड (Prajakta Gaikwad) सध्या चर्चेत आहे
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appछोट्या पडद्यावरील 'स्वराज्यरक्षक संभाजी' (Swarajya Rakshak Sambhaji) या मालिकेतील येसूबाईंच्या भूमिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या प्राजक्ताने इंजिनिअरिंग पूर्ण केलं आहे.
अभिनेत्री म्हणून प्राजक्ताचा प्रवास सुरू होता. पण त्यासोबत ती शिक्षणदेखील पूर्ण करत होती.
प्राजक्ता सध्या डॉक्टर अमोल कोल्हे (Dr. Amol Kolhe) यांच्या 'शिवपुत्र संभाजी' या बहुचर्चित महानाट्यात काम करत आहे.
प्राजक्ता लवकरच एका दाक्षिणात्य सिनेमातही झळकणार आहे.
'नांदा सौख्य भरे', 'स्वराज्यरक्षक संभाजी' आणि 'आई माझी काळुबाई' अशा लोकप्रिय मालिकांमध्ये तिने काम केलं आहे. 'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेत प्राजक्ताने साकारलेली येसूबाईंची भूमिका चांगलीच गाजली होती.
'आई माझी काळुबाई' या मालिकेला रामराम केल्याने अभिनेत्री चांगलीच चर्चेत आली होती.
प्राजक्ताने नुकताच एक नवा लूक शेअर केलाय. यात प्राजक्ता लावणी लूकमध्ये दिसत आहे.
काळी साडी आणि मराठी लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे .