आईचे लाड, कुटुंबाकडून कोडकौतुक..प्राजक्ता गायकवाडचा घाणा अन् बांगड्या भरण्याचा देखणा समारंभ, Photos
प्राजक्ता गायकवाडचा घाणा अन् बांगड्या भरण्याचा देखणा समारंभ नुकताच पार पडला.

Prajakta Gaikwad
1/8
स्वराज्यरक्षक संभाजी फेम अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडनं महाराणी येसूबाई यांची भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकली.
2/8
सध्या प्राजक्तानं तिच्या लग्नामुळे चाहत्यांचं लक्ष वेधून घेतले आहे. नुकताच प्राजक्ताच्या घरी घाणा भरण्याचा आणि बांगड्या भरण्याचा देखणा समारंभ झाला.
3/8
नुकताच तिच्या मेहंदीचा कार्यक्रमही पार पडला त्याच्या आदल्या दिवशी घाण आणि बांगड्या भरण्याचा हा समारंभ साजरा करण्यात आला.
4/8
जात्यासमोर बसलेल्या प्राजक्ताच्या कार्यक्रमातील हसऱ्या गोड लूकवर चाहते भाळले आहेत.
5/8
घरातच जवळच्या नातेवाईकांच्या समवेत झालेल्या या समारंभाचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
6/8
आपल्या आईसोबत मनमुराद हसतानाही ती दिसतेय. घरातील नातेवाईकांसोबत वेळ घालवताना प्राजक्ता या व्हिडिओत दिसतेय.
7/8
देवासमोर मनोभावे हात जोडून बसलेली प्राजक्ता अगदी साधीच पण लावण्या दिसतेय. घरातील कुटुंबीय तिचं भरभरून कौतूक करतायत.
8/8
घाणा भरण्याच्या कार्यक्रमाला प्राजक्ताच्या आईसह घरातील नातेवाईक जमले होते.
Published at : 01 Dec 2025 02:03 PM (IST)