Pooja Sawant Siddhesh Chavan Wedding : अभिनेत्री पूजाचा मेहंदी सोहळाही पार; लवकरच हे जोडपं लग्नबंधनात अडकणार!
अभिनेत्री पूजा सावंत (Pooja Sawant) ही सिद्धेश चव्हाण (Siddhesh Chavan) सोबत लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. (photo:/iampoojasawant/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसध्या पूजा आणि सिद्धेशच्या घरी लगीनसराई सुरु असून लग्नाचे विधी पार पडत आहे.(photo:/iampoojasawant/ig)
पूजा आणि सिद्धशचा धम्माल संगीत सोहळा पार पडल्यानंतर आता पूजाचा मेहंदी सोहळाही पार पडला आहे.(photo:/iampoojasawant/ig)
पूजाच्या मेहंदीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तसेच तिच्या चाहत्यांनी देखील तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केलेत. (photo:/iampoojasawant/ig)
काही दिवसांपूर्वी पूजाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन सिद्धेशसोबतच्या नात्याविषयी कबुली दिली होती. (photo:/iampoojasawant/ig)
त्यानंतर त्यांचा साखरपुडा देखील पार पडला. पूजा मित्रमंडळींनी पूजा आणि सिद्धेशच्या साखरपुड्याला हजेरी लावली होती. तसेच आता पूजा आणि सिद्धेशच्या लग्नसोहळ्यात देखील त्यांच्या मित्रमंडळींनी हजेरी लावली. आता लवकरच हे जोडपं लग्नबंधनात अडकणार आहेत. (photo:/iampoojasawant/ig)
पूजा सावंतने आपल्या अभिनयासह सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. तसेच ती एक उत्तम नृत्यांगनाही आहे(photo:/iampoojasawant/ig)
पूजा सावंतचं नाव अभिनेता वैभव तत्तववादी (Vaibhav Tatwawadi) आणि भूषण प्रधान (Bhushan Pradhan) बरोबरही जोडलं गेलं होतं.(photo:/iampoojasawant/ig)
पूजाने दगळी चाळ, क्षणभर विश्रांती, पोस्टर बॉइज, नीळकंठ मास्तर, भेटली तू पुन्हा, बोनस अशा अनेक गाजलेल्या सिनेमांत काम केलं आहे. तिचे अनेक सिनेमे सुपरहिट ठरले आहेत. (photo:/iampoojasawant/ig)