PHOTO: 'कलरफुल' पूजा सावंतला अखेर मिळाला तिच्या आयुष्याचा जोडीदार!
Continues below advertisement
Pooja Sawant
Continues below advertisement
1/10
अभिनेत्री पूजा सावंत (Pooja Sawant) ही तिच्या अभिनयानं आणि ग्लॅमरस स्टाईलनं प्रेक्षकांची मनं जिंकते.
2/10
पूजा ही मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात.
3/10
क्षणभर विश्रांती या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.
4/10
पूजानं पोस्टर बॉय, सतरंगी रे,गोंदण, आता गं बया,नीळकंठ मास्तर, साटं लोटं पण सगळं खोटं, दगडी चाळ, दगडी चाळ 2 या चित्रपटांमध्ये काम केलं.
5/10
पूजा ही सोशल मीडियावर अॅक्टिव असते. विविध लूकमधील फोटो ती सोशल मीडियावर शेअर करते. तिला इन्स्टाग्रामवर 1.7 मिलियन फॉलोवर्स आहेत.
Continues below advertisement
6/10
'कलरफुल' पूजा सावंतला अखेर तिच्या आयुष्याचा जोडीदार मिळाला आहे. सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत अभिनेत्रीने यासंदर्भात माहिती दिली आहे.
7/10
पूजाने तिच्या जोडीदारासोबतचे तीन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करण्यासोबत तिने खास रोमँटिक कॅप्शनही दिलं आहे.
8/10
समुद्रकिनाऱ्याजवळील एक फोटो शेअर करत तिने लिहिलं आहे,"आयुष्याच्या नव्या अध्यायाची एका खास व्यक्तीसोबत सुरुवात करत आहे". दुसरा फोटो शेअर करत तिने लिहिलं आहे,"प्रेमाची जादू कमाल आहे, नव्या प्रवासाची सुरुवात". तर तिसरा फोटो शेअर करत अभिनेत्रीने लिहिलं आहे,"We Are Engaged".
9/10
पूजा सावंतने आपल्या अभिनयासह सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. तसेच ती एक उत्तम नृत्यांगनाही आहे.
10/10
पूजा सावंतचं नाव अभिनेता वैभव तत्तववादी (Vaibhav Tatwawadi) आणि भूषण प्रधान (Bhushan Pradhan) बरोबरही जोडलं गेलं होतं.
Published at : 28 Nov 2023 02:26 PM (IST)