PHOTO: पूजा हेगडेने नुकतीच एका फ्लाइटमधील कर्मचाऱ्यांवर व्यक्त केली नाराजी; म्हणाली...
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीसह, हिंदी चित्रपटांमध्ये आपला ठसा उमटवणारी अभिनेत्री पूजा हेगडे (Pooja Hegde) हिने अलीकडेच एका फ्लाईट स्टाफवर आपला राग व्यक्त केला. अभिनेत्री पूजा हेगडेने ट्विटद्वारे फ्लाईट स्टाफच्या गैरवर्तनाबद्दल सांगितले.(photo:hegdepooja/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपूजा हेगडेने नुकतीच एका फ्लाइटमधील कर्मचाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली आहे. ट्विटरवर पूजा हेगडेने लिहिले की, 'इंडिगो स्टाफ सदस्याच्या असभ्य वर्तनामुळे खूप दुःख झाले. मुंबईहून विमान प्रवासात एका स्टाफने केलेल्या गैरवर्तनाने मला खूप अस्वस्थ केले आहे. कोणतेही कारण नसताना त्यांनी आमच्याशी उद्धट, धमकावणीच्या सुरात बातचीत केली. सहसा मी अशा गोष्टींवर ट्विट करत नाही, पण ते खरोखरच भयानक होते.’(photo:hegdepooja/ig)
पूजा हेगडेने तिच्या ट्विटमध्ये इंडिगो एअरलाइन्सला टॅग केले असून, कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या असभ्य वर्तनाबद्दल सांगितले आहे. या ट्विटला आतापर्यंत 3334 वेळा रिट्विट करण्यात आले असून त्याला 32 हजार लाईक्स मिळाले आहेत.(photo:hegdepooja/ig)
पूजा हेगडेने तिच्या ट्विटर अकाऊंटवर इंडिगोविरोधात ट्विट करताच, इंडिगोने लगेचच तिच्या ट्विटला उत्तर देत तिची माफी मागितली. इंडिगो एअरलाइन्सने देखील ट्विटला उत्तर देत अभिनेत्रीचा पीएनआर आणि संपर्क क्रमांक डीएम करण्यास सांगितले आहे. या ट्विटला पूजा हेगडेने अद्याप कोणतेही उत्तर दिलेले नाही.(photo:hegdepooja/ig)
पूजा हेगडेच्या या ट्विटवर यूजर्स वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. यातील काही लोक एअरलाईनवर राग व्यक्त करत आहेत, तर काही लोक पूजा हेगडेलाच सल्ला देत आहेत. पूजा हेगडेच्या या ट्विटची चर्चा रंगली असून, या अभिनेत्रीच्या ट्विटवर लोक संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत.(photo:hegdepooja/ig)
पूजा हेगडेच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, नुकताच पूजा हेगडेचा 'आर्चाय' हा चित्रपट प्रदर्शित झाला, ज्याला फारसा चांगला प्रतिसाद मिळाला नाही. परंतु, या चित्रपटातील पूजाच्या अभिनयाला चांगलीच पसंती मिळाली आहे. पूजा हेगडे तिच्या सौंदर्यामुळे सोशल मीडियावर वर्चस्व गाजवते आणि अलीकडेच तिने कान्समध्येही भाग घेतला होता. या सोहळ्यातील तिचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते.(photo:hegdepooja/ig)