Javed Akhtar : पाकिस्तान नागरिकांना जावेद अख्तर यांनी दाखवला 'आरसा'!
पाकिस्तानमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात लेखक जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी हजेरी लावली होती.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपाकिस्तानमध्ये या कर्यक्रमामध्ये जावेद अख्तर यांनी अनेक विषयांवर चर्चा केली.
पाकिस्तानमध्ये या कार्यक्रमामध्ये त्यांनी मुंबई हल्ल्याबाबत वक्तव्य केलं.
जावेद अख्तर म्हणाले, 'आम्ही मुंबईकर आहोत. आमच्या शहरावर हल्ला कसा झाला? ते आम्ही पाहिले. ते लोक ना नॉर्वेतून आले होते ना इजिप्तमधून आले होते, ते हल्ल्याचे सूत्रधार अजूनही तुमच्या देशात खुलेआम फिरत आहेत.'
पुढे ते म्हणाले, 'आम्ही नुसरत फतेह अली खान, मेहंदी हसन यांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले. तुमच्या देशात तर लता मंगेशकर यांच्या कार्यक्रमाचे आयोजन झाले नाही.'
जावेद यांच्या या वक्तव्यानं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
जावेद अख्तर यांचा लाहोरमधील एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये जावेद अख्तर हे 'जिंदगी आ रहा हूं मैं' हे गाणं गाताना दिसत आहेत.
जावेद अख्तर हे विविध विषयांवर मत व्यक्त करत असतात.
जावेद अख्तर यांचा चाहता वर्ग मोठा आहे. त्यांनी संवाद-पटकथा लेखन केलेले चित्रपट गाजले आहेत. त्याशिवाय, त्यांनी लिहिलेली गाणीदेखील प्रसिद्ध आहेत.