PHOTO: असा होता रमेश देव यांचा जीवनप्रवास...जाणून घ्या फोटोंच्या स्वरुपात
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे निधन झाले आहे. हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या 93 व्या वर्षी प्राणज्योत मालवली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयाबद्दलची माहिती त्यांचा मुलगा आणि अभिनेता अजिंक्य देव यांनी दिली आहे. मुंबईतील धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.
रमेश देव अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक आहेत. त्यांचा जन्म 30 जानेवारी 1929 कोल्हापूरमध्ये झाला.
'आनंद' या चित्रपटातील भूमिकेसाठी ते ओळखले जातात. 1956 साली रमेश देव यांनी 'आंधळा मागतो एक डोळा' या चित्रपटातून त्यांनी चित्रपटक्षेत्रात पदार्पण केले.
'आरती' हा त्यांचा बॉलीवूडमधील पहिला चित्रपट होता. रमेश देव यांनी दिग्दर्शन तसेच अनेक टीव्ही मालिका आणि नाटकांची निर्मिती केली आहे. त्यांनी 'पैशाचा पाऊस' आणि 'भाग्यलक्ष्मी' या चित्रपटांत काम केले.
रमेश देव (Ramesh Deo) यांनी मराठी तसेच हिंदी भाषेतील अनेक सिनेमांमध्ये काम केले. त्यांनी 1962 मध्ये अभिनेत्री सीमा देव (Seema Deo) यांच्यासोबत लग्न केले. रमेश देव आणि सीमा देव यांनी अनेक चित्रपटांत सोबत काम केले. या दोघांचे अनेक चित्रपट चांगलेच गाजले.