PHOTO: 'राजा रानीची गं जोडी' फेम अभिनेत्री शिवानी सोनारच्या लग्नाचे खास फोटो!
'राजा रानीची गं जोडी', 'सिंधूताई माझी माई' आणि अलीकडेच आलेली 'तू भेटशी नव्याने' या मालिकेतून शिवानीने प्रेक्षकांचे मनोरंजन केले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतर 'रंग माझा वेगळा', 'लोकमान्य', 'दुर्गा' या मालिकांमधून अंबर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता
सध्या शिवानी आणि अंबरच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
मोठ्या थाटामाटात शिवानी व अंबरचा साखरपुडा झाला होता.
दोघांनी अचानक सोशल मीडियावर साखरपुड्याचे फोटो शेअर केल्यामुळे चाहत्यांना सुखद धक्काच बसला होता.
मराठी कलाविश्वात सध्या अभिनेत्री शिवानी सोनारच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे.
लग्नसोहळ्यात शिवानीने खास पारंपरिक लूक केल्याचं पाहायला मिळालं.
हिरव्या रंगाची नऊवारी साडी, हातात चुडा, गळ्यात भरजरी दागिने, कपाळी चंद्रकोर, नाकात नथ या लूकमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत होती.
शिवानीच्या लूकच सोशल मीडियावर देखील भरभरून कौतुक करण्यात येत आहे.