पायल रोहतगीने घेतला लग्नाचा निर्णय, या दिवशी संग्रामसोबत घेणार सात फेरे
बॉलिवूड आणि टेलिव्हिजन अभिनेत्री पायल रोहतगी आणि माजी कुस्तीपटू संग्राम सिंह दीर्घकाळापासून एकमेकांसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये आहेत. (photo:sangramsingh_wrestler/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआता अखेर दोघांनी आपल्या नात्याचे लग्नात रुपांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. (photo:sangramsingh_wrestler/ig)
या जोडप्याने त्यांच्या लग्नाची तारीखही जाहीर केली आहे. पायल आणि संग्राम जुलै महिन्यात लग्नबंधनात अडकणार आहेत. काही काळापूर्वी संग्राम सिंहने 'लॉक अप' या रिअॅलिटी शोमध्ये पायलला वचन दिले होते की ते जुलैमध्ये लग्न करतील. (photo:sangramsingh_wrestler/ig)
आता संग्राम त्याचं आश्वासन पूर्ण करणार आहे. दोघांनी सोशल मीडिया इंस्टाग्राम हँडलवर स्वतःचा एक फोटो शेअर करून त्यांच्या लग्नाची माहिती चाहत्यांसोबत शेअर केली आहे. (photo:sangramsingh_wrestler/ig)
'लॉक अप' या रिअॅलिटी शोमध्ये पायलने तिला मूल होणार नसल्याचे गुपित उघड केले आहे. पायलने असेही सांगितले की तिने संग्रामला दुसरी मुलगी शोधण्यास सांगितले पण त्याने नकार दिला. (photo:sangramsingh_wrestler/ig)
सध्या तरी लग्नाची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. संग्रामने प्रसारमाध्यमांना सांगितले की, सुरुवातीला 21 जुलैचा विचार केला होता पण अजून काही निश्चित नाही, पण लग्न जुलैमध्ये होणार हे निश्चित आहे. (photo:sangramsingh_wrestler/ig)