राज्याच्या लढ्यातील झंझावाती महापराक्रमाची विजयगाथा 'पावनखिंड' या दिवशी होणार प्रदर्शित
pavankhind
1/6
फर्जंद, फत्तेशिकस्तच्या यशस्वी घोडदौडनंतर दिग्पाल लांजेकर आता 'पावनखिंड' सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे
2/6
हा सिनेमा 21 जानेवारीला प्रदर्शित होणार होता.
3/6
पण वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली होती.
4/6
आता हा सिनेमा 18 फेब्रुवारीला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
5/6
सिनेमाचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी सिनेमाचे नवे पोस्टर शेअर करत लिहिले आहे, स्वराज्य रक्षणासाठी रचलेल्या रणसंग्रामाचं अग्निकुंड आपल्या भगव्या रक्ताने धगधगतं ठेवणाऱ्या मराठ्यांच्या स्वामीनिष्ठेची, त्यागाची आणि पराक्रमाची गौरवगाथा म्हणजे पावनखिंड....18 फेब्रुवारी 2022 रोजी फक्त चित्रपटगृहात!"
6/6
'पावनखिंड' सिनेमाचे लेखन आणि दिग्दर्शन दिग्पाल लांजेकरने केले आहे. या सिनेमाच्या माध्यमातून महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्ण इतिहासातील आणखी एक सोनेरी अध्याय मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार आहे. सिनेमात छत्रपतींच्या भूमिकेत अभिनेता चिन्मय मांडलेकर झळकणार आहे.
Published at : 17 Jan 2022 06:15 PM (IST)