परिणीती-राघव चड्ढा यांचा उद्या नवी-दिल्लीत होणार साखरपुडा
'लेडीज वर्सेस रिकी बहल'च्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणारी परिणीती चोप्रा लवकरच आम आदमी पार्टीचे खासदार राघव चड्ढा यांच्यासोबत लग्नबंधनात अडकणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमीडिया रिपोर्टनुसार, येत्या 13 मे ला (उद्या) परिणीती आणि राघव यांचा नवी-दिल्लीत साखरपुडा होणार आहे.
परिणीती आणि राघव रिलेशनमध्ये असल्याच्या चर्चांना गेल्या काही दिवसांपूर्वी सुरुवात झाली आहे.
परिणीती आणि राघव दोघांनाही अनेकदा लंच आणि डिनर डेटला स्पॉट करण्यात आलं आहे.
मुंबई आणि दिल्ली विमानतळावरदेखील अनेकदा परिणीती आणि राघव स्पॉट झाले आहेत.
परिणीती आणि राघव यांच्या साखरपुड्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
परिणीती आणि राघव यांचा साखरपुडा कुटुंबीय आणि जवळच्या मित्र-मंडळींच्या उपस्थितीत पार पडणार आहे.
फक्त 150 पाहुण्यांच्या उपस्थितीत परिणीती आणि राघव यांचा साखरपुडा होणार आहे.
परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या लग्नसोहळ्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.
येत्या ऑक्टोबर महिन्यात परिणीती आणि राघव लग्न करणार असल्याचं म्हटलं जात आहे.