पंचायतमधील मंजूदेवी स्कर्ट-टॉपवर, रिंकी ग्लॅमरस लूक; बिनोदचा अनोखा अंदाज; पाहा फोटो
panchayat season 4 : पंचायत या वेबसिरीजमधील कलाकारांनी खास फोटोशूट केलंय.
Continues below advertisement
panchayat season 4
Continues below advertisement
1/9
वेब सीरिज ‘पंचायत’च्या चौथ्या सिझनला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. तरीही मेकर्स अजूनही प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. नुकतंच शोच्या कलाकारांनी एक नवीन फोटोशूट केलं आहे. हे फोटोशूट पिकलबॉल कोर्टवर सेट करण्यात आलं असून, फुलेरा गावचे हे सगळे पात्रं खूपच ग्लॅमरस आणि बोल्ड अवतारात दिसत आहेत.
2/9
‘पंचायत’चे कलाकार त्यांच्या या नवीन फोटोशूटमुळे इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहेत. फुलेराच्या पारंपरिक ग्रामीण पोशाखाऐवजी सगळ्यांनी खूपच स्टायलिश आणि ग्लॅमरस कपडे परिधान केले आहेत. रिंकी आणि मंजू देवीचा लुक पाहून तुम्ही थक्क व्हाल!
3/9
रिंकीचा हा ग्लॅमरस मेकओव्हर पुन्हा एकदा सचिवजीला वेड लावणारा ठरतो आहे! रिंकी खरोखरच खूपच ग्लॅमरस आणि बोल्ड दिसते आहे. तिच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास स्पष्ट दिसून येतो.
4/9
पण खरी धमाल मंजू देवी, म्हणजेच नीना गुप्ता करत आहेत. फुलेरा गावात घुंघट घेणारी साधी ग्रामीण महिला आता मिनी स्कर्टमध्ये बिनधास्त पोज देताना दिसत आहे.
5/9
क्रांती देवी, म्हणजेच सुनीता राजवार, देखील मागे नाहीत! फुलेराची नवी निवडून आलेली सरपंच कोर्टरूममध्ये बसून जबरदस्त स्टायलिश पोज देत आहे आणि दाखवत आहे की खरी विनर कोण आहे.
Continues below advertisement
6/9
भूषण उर्फ बनराकास म्हणजे दुर्गेश कुमार आपल्या पत्नीसोबत स्टायलिश ग्रीन एथलीझर लुकमध्ये उत्तम जोडी करताना दिसतो आहे. त्याचा हा स्पोर्टी लुक लक्ष वेधून घेतो आहे.
7/9
सचिवजी आणि रिंकी आपल्या स्टायलिश एथलीझर लुकमध्ये ओळखूही येत नाहीत. या दोघांनी एकत्र काही रोमँटिक आणि बोल्ड पोझेस दिल्या आहेत. एका फोटोमध्ये सान्विकाने (रिंकीने) जितेंद्र कुमारच्या पाठीवर चढून हसतमुख पोज दिली आहे.
8/9
‘पंचायत’च्या या कलाकारांचा ग्लॅमरस फोटोशूट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मात्र, यामध्ये प्रधानजी आणि प्रह्लाद चाचा दिसले नाहीत, त्यामुळे चाहत्यांना त्यांची उणीव जाणवत आहे. एका युझरने कमेंट केली – “प्रह्लाद चा आणि प्रधानजी कदाचित बाटली घ्यायला गेले असावेत!”
9/9
बिनोदची भूमिका साकारणारा अशोक पाठक हेडबँडसह अगदीच कूल वाइब देत आहे. त्याचा हा लुक फुलेराच्या इमेजपासून खूपच वेगळा आहे.
Published at : 04 Jul 2025 08:33 PM (IST)