OTT Upcoming Web Series : 'या' मोठ्या वेबसिरीजचे नवीन सीझन OTT वर लवकरच प्रदर्शित होणार!

web series

1/6
OTT Upcoming Web Series : टीव्ही आणि सिनेमानंतर प्रेक्षक आता ओटीटी माध्यमाकडे वळाले आहेत. गेल्या काही वर्षांत ओटीटी माध्यमाची लोकप्रियतादेखील वाढली आहे. प्रेक्षक एक वेबसीरिज संपल्यानंतर दुसऱ्या वेबसीरिजची प्रतिक्षा करताना दिसत आहेत. येत्या काळात अनेक लोकप्रिय वेबसीरिजचे नवे सीझन येणार आहेत. प्रेक्षकदेखील या वेबसीरिजची आतुरतेने वाट पाहत आहेत. यात सुष्मिता सेनच्या 'आर्या 2' ते 'मिर्झापूर 3', 'मनी हीस्ट 5', 'असुर 2' अशा अनेक लोकप्रिय वेबसीरिजचा समावेश आहे.
2/6
आर्या 2 : सुष्मिताच्या 'आर्या-2' (Aarya 2) या वेब सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ट्रेलरमधील सुष्मिताच्या अभिनयाने अनेकांचे लक्ष वेधले आहे. आता आर्या-2 चा ट्रेलर पाहून सुष्मिताचे चाहते या सीरिजची उत्सुकतेने वाट पाहात आहेत. 10 डिसेंबरला हॉटस्टारवर ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
3/6
दिल्ली क्राईम 2 : दिल्ली गँग रेपवर बनलेल्या दिल्ली क्राईम या वेबसीरिजच्या पहिल्या सीझनला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. आता या वेबसीरिजच्या दुसऱ्या सीझनच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे.
4/6
'मनी हाईस्ट 5 : 'मनी हाईस्ट 5' या वेबसीरिजने जगभरात लोकप्रियता मिळवली आहे. मनी हीस्टच्या पाचव्या भागाचा दुसरा भाग डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे. ही वेबसीरिज 3 डिसेंबरला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
5/6
असुर 2 : अर्शद वारसी आणि बरुण सोबती यांच्या 'असुर 2' या वेबसीरिजचे सध्या शूटिंग सुरू आहे. या वेबसीरिजच्या पहिल्या सीझनला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती.
6/6
मिर्झापूर 3 : मिर्झापूरचे आतापर्यंत दोन सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. या सीझनमधली पंकज त्रिपाठीची भैय्याची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. मिर्झापूरचा तिसरा सीझनदेखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Sponsored Links by Taboola