Samay Raina Show India's Got Latent: 'इंडियाज गॉट लेटेंट' शो नेमका आहे काय? अश्लील कंटेंटमुळे प्रसिद्ध असलेल्या शोमधून लाखोंची कमाई, कुठे पाहू शकता?
Samay Raina Show Indias Got Latent: दिवसेंदिवस प्रसिद्धीझोतात येणारं इंडियाज गॉट लेटेंट अखेर अडचणीत सापडलंच. रणवीर अलाहबादिया, समय रैना, अपूर्व मखीजा आणि इतरांविरुद्ध FIR दाखल करण्यात आला आहे.
Samay Raina Show India's Got Latent
1/9
Samay Raina Show: 'इंडियाज गॉट लेंटेट' हा शो पुन्हा एकदा त्याच्या वादग्रस्त आणि अश्लील कंटेंटमुळे चर्चेत आला आहे. समय रैनाचा हा शो नेमका काय आहे आणि आपण तो कुठे पाहू शकतो? सविस्तर आपण जाणून घेऊयात.
2/9
समय रैना, आज या नावाची ओळख करून देण्याची गरज नाही. समय हा एक स्टँड-अप कॉमेडियन, युट्यूबर आणि बुद्धिबळ प्रमोटर आहे. जो अलिकडेच अमिताभ बच्चन यांच्या 'केबीसी' शोमध्येही दिसला होता. पण आता तो त्याच्या 'इंडियाज गॉट टॅलेंट' या शोमुळे चर्चेत आहे.
3/9
खरंतर समय रैनाचा 'इंडियाज गॉट लेंटेट' हा एक कॉमेडी शो आहे. ज्यामध्ये तुम्हाला अश्लील कॉमेडी पाहायला मिळेल. हा शो यूट्यूबवर स्ट्रीम केला जातो. तुम्ही तो समय रैनाच्या यूट्यूब चॅनेलवरही सहज पाहू शकता.
4/9
आतापर्यंत रॅपर रफ्तार, पूनम पांडे, राखी सावंत, भारती सिंह यांच्यासह अनेक मोठ्या सेलिब्रिटींनी समयच्या या शोमध्ये भाग घेतला आहे. हा शो खूप लोकप्रिय आहे आणि प्रत्येक एपिसोडला YouTube वर लाखो व्ह्यूज मिळतात.
5/9
शोच्या एका नव्या एपिसोडमध्ये युट्यूबर्स आशिष चंचलानी, अपूर्वा मुखिजा, रणवीर अलाहबादिया सहभागी झाले होते. अशातच रणवीर अलाहाबादियानं शोमध्ये विचारलेल्या एका प्रश्नामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. त्यामुळे सर्वत्र गोंधळ उडाला आहे.
6/9
खरं तर, रणवीरनं शोमधील स्पर्धकाला विचारलं की, "तुम्हाला आयुष्यभर तुमच्या पालकांना दररोज इंटिमेट होताना पहायचं आहे की, तुम्हालाही एकदा त्यांच्यासोबत सामील व्हायला आवडेल?"
7/9
रणवीरचा हा प्रश्न ऐकताच समय रैनाही आश्चर्यचकीत झाल्याचं पाहायला मिळालं. या प्रश्नानंतर समय म्हणाला की, "अरे हा यांच्या पॉडकास्टचा रिजेक्टेड प्रश्न आहे. हा काय प्रश्न आहे? काय झालंय रणवीर भाई तुला?"
8/9
अशातच आता आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे रणवीर अलाहाबादिया कायद्याच्या कचाट्यात अडकला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रणवीरसोबत याप्रकरणी समय रैनाविरोधातही तक्रार दाखल करण्यात आली आहे.
9/9
दरम्यान, समय रैना एक प्रसिद्ध युट्यूबर आहे. त्याची सोशल मीडियावर तगडी फॅन फॉलोइंग आहे. आपल्या चॅनलवरुन तो दरमहा लाखोंची कमाई करतो.
Published at : 11 Feb 2025 08:04 AM (IST)