सस्पेन्स थ्रिलर, हॉरर अन् कोर्ट ड्रामा...; व्हॅलेंटाईन विकेंडला घरबसल्या जोडीदारासोबत पाहा 7 जबरदस्त OTT चित्रपट
Complete List of Movies & Series Releasing This Week on OTT: 9 फेब्रुवारी 2026 पासून ओटीटी प्लॅटफॉर्मवर मनोरंजनाची मेजवानी पाहायला मिळणार आहे.

OTT Releases This Week Movies and Web Series Streaming from February 9
1/9
New OTT Releases: प्रेक्षकांसाठी खुशखबर. हा वीक मनोरंजनाचा आठवडा ठरेल, कारण एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट आणि वेब सिरीज ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. 9 फेब्रुवारी 2026 रोजी नवीन चित्रपट आणि शो ऑनलाइन स्ट्रीम होणार आहेत.
2/9
चिरंजीवीचा आगामी तेलुगू चित्रपट 'मन शंकर वर प्रसाद गरू' पासून ते 'द कॉन्ज्युरिंग'च्या शेवटच्या चॅप्टरपर्यंत, प्रेक्षकांची या आठवड्यात नक्कीच मनोरंजनाची मेजवानी होणार आहे. या आठवड्यात हॉरर चित्रपट, क्राइम, ड्रामा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. अॅक्शन थ्रिलर आणि मर्डर मिस्ट्री चित्रपटांचा देखील आपण आनंद घेऊ शकता. या आठवड्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर नेमके कोणते चित्रपट रिलीज होणार? संपूर्ण यादी पाहूयात.
3/9
कोहरा सिझन 2 ही वेब सिरीज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. पंजाबमध्ये घडलेल्या क्राइम थ्रिलरच्या या नव्या सिझनमध्ये महिलेचा मृत्यू आणि तिच्या भोवती फिरणारी स्टोरी दाखवण्यात आली आहे. या महिलेचा मृतदेह एका गोठ्यात सापडतो. नंतर पोलिसांकडून शोध सुरू होतो. हा चित्रपट आपल्याला 11 फेब्रुवारी रोजी पाहता येईल.
4/9
ZEE5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर चिरंजीवी यांचा मन शंकरा वारा प्रसाद गरू हा अॅक्शन कॉमेडी चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट आपल्याला 11 फेब्रुवारी रोजी पाहता येईल.
5/9
लव्ह इज ब्लाइंड सीझन 10 ही सिरीज 11 फेब्रुवारी रोजी आपल्याला नेटफ्लिक्सवर पाहता येईल. या सिरीजची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.
6/9
एका सत्य घटनेवर आधारीत, द कॉन्ज्युरिंगचा लास्ट चॅप्टर 13 फेब्रुवारी रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात एक कुटुंब शापित प्राचीन आरशाशी जोडलेल्या आत्म्याशी लढतात. शेवटी नेमकं काय होतं? हे आपल्याला सिरीजमधून पाहता येईल.
7/9
सोनी लाइव्हवर बेबी गर्ल हा चित्रपट 12 फेब्रुवारी रोजी रिलीज होणार आहे. तिरूअनंतपुरममध्ये एका नवजात बाळाच्या बेपत्ता झाल्यानंतर रूग्णालयातील एका परिचारिकेवर संशय येतो. तपास सुरू होताच या प्रकरणाला अनेक वळण येतात.
8/9
अंकुर तिवारी आणि स्वानंद किरकिरे यांनी निर्मित केलेला बँडवाले अमेझॉन प्राइमवर रिलीज होणार आहे. ही एक म्युझिकल सिरीज असून, 13 फेब्रुवारी रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या सिरीजमध्ये शालिनी पांडे प्रमुख भूमिकेत असून, तर स्वानंद किरकिरे रोबो नावाची भूमिका साकारत आहेत.
9/9
11 फेब्रुवारी रोजी अमेझॉन एमएक्स प्लेअरवर राजीव खंडेलवालचा अमर विश्वास हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या कोर्टरूम थ्रिलर चित्रपटातून राजीव पुन्हा ओटीटीवर पुनरागमन करत आहेत. या सिरीजमध्ये राजीव एका हाय प्रोफाइल खून खटला हाताळणाऱ्या वकिलाची भूमिका साकारत आहे.
Published at : 10 Feb 2026 02:56 PM (IST)