OTT Release This Week: स्पाय-ॲक्शन-कॉमेडी-थ्रिलरचा तडका, या आठवड्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर मनोरंजनाचा धमाका!
नॅटली रे आणि अँजेला पॅटन यांचे दिग्दर्शन असलेला 'डाउटर्स' हा चित्रपट इमोशनल बायोपिक आहे. हा चित्रपट चार मुलींच्या कठीण आणि भावनिक जीवनावर आधारित आहे. या माहितीपटात वडील आणि मुलीचे नाते अतिशय हृ़दयस्पर्शी पध्दतीने दाखवण्यात आले आहे. डाउटर्स माहितीपटासाठी पुरस्कारही मिळाला. ही वेब सीरिज नेटफ्लिक्सवर पाहू शकता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App'वर्स्ट एक्स लव्हर' ही एक डॉक्युमेंटरी आहे. यामध्ये प्रेमाची काळी बाजू दाखवण्यात आली आहे. यामध्ये ब्रेकअपच्या वेदना, त्याचे दु:ख, त्यातून बाहेर पडण्यासाठी एखादी व्यक्ती काय करू शकते हे दाखवण्यात आले आहे. ही डॉक्युमेंटरी नेटफ्लिक्सवर पाहू शकता.
काला ( परमवीर सिंग चीमा ) हा या सीरिजच्या केंद्रस्थानी आहे. काला हा पंजाबी संगीत उद्योगातील उजेडात न आलेले पैलू उलगडतो. तो त्याच्या वडिलांच्या स्टेजवरील रहस्यमय खुनामागील सत्य शोधत आहे. याचा बदलाही त्याला घ्यायचा आहे. सत्ता, वारसा आणि विश्वासघात यांची कथा सीरिजमध्ये आहे. 'चमक: द कन्क्लूजन' ही वेब सीरिज सोनी लिव्हवर बघता येईल.
स्पाय-अॅक्शन-कॉमे़डी-थ्रिलर 'द यूनियन'मध्ये मार्क वाहलबर्गने माईक या न्यू जर्सीतील एका कामगराची भूमिका केली आहे. शालेय जीवनातील त्याची प्रेयसी रॉक्सॅन ही त्याच्या आयुष्यात पुन्हा आल्यानंतर त्यांचे आयुष्य बदलून जाते. त्यांच्या आयुष्यात अशा घडामोडी घडतात की ते अमेरिकेच्या गुप्त मोहिमेचा भाग होतात. हा चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता.
'जॅकपॉट' या चित्रपटात भविष्यकाळातील कॅलिफोर्नियातील ही कथा आहे. अभिनेत्री होण्याची इच्छा असलेली केटी ही नकळतपणे कुख्यात ग्रँड लॉटरीची विजेती होते. या खेळानुसार, कोणतीही व्यक्ती सूर्यास्तापर्यंत केटीला ठार करुन कायदेशीर मार्गाने हा जॅकपॉट आपल्या नावे करु शकतो. आता, केटी काय करणार? केटीच्या मदतीला कोण येणार, याचा उलगडा चित्रपटात होईल. हा चित्रपट अॅमेझॉन प्राईम व्हीडिओवर पाहू शकता.
'इंडस्ट्री सीझन 3' मध्ये आंतरराष्ट्रीय वित्तीय जगतात आता आणखी मोठ्या घडामोडी घडणार आहेत. पिअरपॉइंट अँड कंपनी एक धाडसी पाऊल ऊचलते. या सीझनची कथा ही सर हेन्नी मॉक यांच्या ( किच हॅरिंग्टन) ग्रीन टेक एनर्जी कंपनी लुमीच्या हाय-प्रोफाइल आयपीओभोवती फिरते. ही वेब सीरिज ओटीटी प्लॅटफॉर्म जिओ सिनेमावर पाहू शकता.
या आठवड्यात 'शेखर होम' ही वेब सीरिज ओटीटी प्लॅचफॉर्मवर प्रदर्शित झाली आहे. 1990 च्या दशकाच्या सुरुवातीला बंगालमधील शहर लोनपूरनमध्ये ही कथा बेतलेली आहे. या मालिकेची कथा शेखरभोवती फिरते कारण तो न उलगडलेल्या रहस्यांच्या जाळ्यात अडकतो. ही वेब सीरिज ओटीटी प्लॅटफॉर्म जिओ सिनेमावर बघता येईल.