काजोल-अजयची लेक न्यासा देवगण लवकरच बॉलिवूड डेब्यू करणार? मनीष मल्होत्रानं दिली महत्त्वाची हिंट
Nysa Devgan New Look: न्यासा देवगणचे तिच्या नव्या लूकमधले फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. फोटोंमध्ये न्यासा ट्रेडिशनल लूक फ्लॉन्ट करत असल्याचं पाहायला मिळत आहे.
Nysa Devgan New Look
1/10
अजय देवगण आणि काजोलची मुलगी न्यासा देवगण सध्या बॉलिवूडपासून दूर आहे. दरम्यान, कधीकाळी तिला ट्रोल करणारे नेटकरीही आता न्यासाच्या लूकचे फॅन झाले आहेत. एवढंच काय तर, न्यालाच्या बॉलिवूड डेब्यूबाबत चर्चाही सुरू झाल्या आहेत.
2/10
न्यासाची आई काजोल आणि वडील अजय देवगण दोघांनीही अनेकदा न्यासाच्या बॉलिवूड डेब्यूवर थेट भाष्य केलं आहे. सध्या न्यासाचा बॉलिवूडमध्ये काम करण्याचा कोणताही विचार नाही, हे दोघांनीही अनेकदा स्पष्ट केलं आहे.
3/10
आई-वडिलांनी नाही, पण प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रानं न्यासाच्या बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्याबाबत स्पष्ट संकेत दिले आहेत. मनीष मल्होत्रानं न्यासाचे अनेक फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये न्यासा कमालीची सुंदर दिसत आहे.
4/10
फोटोंच्या कॅप्शनमध्ये मनीष मल्होत्रानं लिहिलंय की, न्यासा सिनेमा तुझी वाट पाहतोय. इवारा कलेक्शनमध्ये न्यासा खरंच खूपच सुंदर दिसत आहे.
5/10
मनीषच्या या पोस्टवर ओरीनंही कमेंट केली आहे. ओरीनं म्हटलंय की, आता मी तुझ्या बॉलिवूड डेब्यूसाठी आणखी वाट पाहू शकत नाही. तर, न्यासाची आई काजोलनं रेड हार्ट इमोजी पोस्ट करत कमेंट केली आहे.
6/10
फोटोंमध्ये न्यासा ब्रोकेड लेहेंग्यात दिसत आहे. तिनं गुलाबी आणि पिवळ्या रंगाचा लेहंगा वेअर केला होता. यासोबत गळ्यात एक सुंदर नेकलेस वेअर केलाय. तिनं आपल्या कुरळ्या केसांनी हा लूक पूर्ण केलाय.
7/10
यासोबतच न्यासानं लाईट मेकअप केला आहे. या संपूर्ण लूकमध्ये न्यासा खूपच सुंदर दिसतेय. चाहते तिच्या लूकवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.
8/10
न्यासाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल होतात. तिचा वेस्टर्न ते एथनिक लूकमधील अंदाज सर्वांना आवडतोय.
9/10
न्यासा 22 वर्षांची आहे. तिचा जन्म 20 एप्रिल 2003 रोजी झाला. न्यासानं आपलं शिक्षण सिंगापूरमधून पूर्ण केलंय.
10/10
न्यासा सोशल मीडियावरही खूप सक्रीय आहे. ती अनेकदा इन्स्टाग्रामद्वारे तिच्या चाहत्यांना अपडेट्स देत असते.
Published at : 30 Apr 2025 07:14 AM (IST)