Nora Fatehi : नोरा फतेहीने सांगितली तिच्या बालपणीची 'ही' आठवण..
बॉलिवूडमध्ये डान्सिंग स्टार अशी विशेष ओळख निर्माण करणारी नोरा फतेही (Nora Fatehi) तिच्या नृत्यानं आणि अभिनयानं प्रेक्षकांचे नेहमी मनोरंजन करते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदिलबर दिलबर, हाय गरमी या गाण्यांमधील नृत्यामुळे नोराला विशेष लोकप्रियता मिळाली. डान्समुळे विशेष ओळख निर्माण करणाऱ्या नोरानं बालपणी डान्स केल्यानं आईचा आनेकदा मार खाल्ला आहे.
नोराने तिच्या बालपणीची ही आठवण एका मुलाखतीमध्ये सांगितली होती.
नोराच्या कुटुंबामधील लोकांचे असे मत होते की, डान्स करणं ही अत्यंत वाईट गोष्ट आहे.
. त्यामुळे नोराला घरात डान्स करण्यास बंदी होती. नोराला डान्सची आवड होती. ती लपून छपून डान्स करत होती. तिला बॉलिवूडमधील गाण्यांवर डान्स करायला आवडत होते.
जेव्हा नोरा लपून डान्स करत होती तेव्हा तिची आई तिला मारत असे. नोराने जेव्हा भारतात जाऊन काम करण्याचा निर्णय घेतला तेव्हा तिच्या कुटुंबाने तिच्या या निर्णयाचा विरोध केला होता. (all photo: norafatehi/ig)