Nikki Tambolis Glamorous Look : बाईsss!! 'बदन पे सितारे लपेटे हुए'; ऑफ शोल्डर ड्रेसवर निक्की तांबोळीची अदाकारी तर पाहा, ग्लॅमरस लूक व्हायरल
Nikki Tambolis Glamorous Look : अभिनेत्री निक्की तांबोळीचा ग्लॅमरस लूक सोशल मीडियात व्हायरल. हटके कॅप्शनमधून तिनं ट्रोलर्सना सडतोड उत्तर दिलं.
Continues below advertisement
Nikki Tambolis Glamorous Look
Continues below advertisement
1/10
'बाईsss काय प्रकार' हा डॉयलॉग व्हायरल झाला अन् अभिनेत्री निक्की तांबोळी रातोरात फेमस झाली. तिला खरी ओळख मराठी बिग बॉस या रिअॅलिटी शोमुळे मिळाली, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
2/10
रूपरे पडद्यापासून दूर जरी असली तरी, कार्यक्रम आणि सोशल मीडियावर बरीच सक्रीय असते. विशेषत:तिचा बॉयफ्रेंड अरबाज पटेलसोबत तिचे घट्ट नाते आहे.
3/10
निक्कीने अलिकडेच अरबाजचा हात धरून एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. तिनं सुंदर गाउन परिधान केला होता. क्रीम कलरच्या बॉडी हगिंग गाउनमध्ये निक्की सुरेख अन् मनमोहक दिसत होती. खांद्यावर नेट डिटेलिंग होती.
4/10
निक्कीने ऑफ शोल्डर गाउन घातला होता. डायमंड हँड वर्कमुळे गाउनची शोभा वाढली. मागच्या बाजूला लाँग ट्रेल पण होती. जी अरबाज पटेल हाताळताना दिसत होता.
5/10
निक्कीने लाल रंगाची लिपस्टिक लावली होती. तसेच तिने केस कर्ल आणि ओपन ठेवले होते. तिनं या शाईनी ड्रेसवर हाय हिल्स घातले होते.
Continues below advertisement
6/10
निक्कीने हे फोटो सोशल मीडियात शेअर केले होते. तिचे या आउटफिटमधील फोटो प्रचंड व्हायरल झाले.
7/10
निक्कीच्या फोटोवर एका चाहत्याने कमेंट करून लिहिले की, "या ड्रेसमध्ये तू खूप फिट आणि तंदुरूस्त दिसत आहे. तू हुस्न परी दिसत आहे". तर, आणखी एका नेटकऱ्याने "अरबाज आणि निक्कीची जोडी खूप सुंदर दिसते", अशी कमेंट केली आहे.
8/10
निक्कीने तिच्या लूकचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
9/10
तिनं या पोस्टवर हटके कॅप्शन दिला आहे. तिनं फोटोतील कॅप्शनद्वारे ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिलं आहे.
10/10
तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं की, "Jealous? Over a seat I dominated first? Be serious. You're living off my leftovers…" सध्या निक्कीची ही पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
Published at : 23 Dec 2025 11:39 AM (IST)