2025 मध्ये Netflix वर मनोरंजनाचा फुल्ल डोस; 'नादानियां', 'कोहरा' अन् 'दिल्ली क्राईम सीझन 3' धमाकेदार वेब सीरिजची मेजवानी

Netflix 2025 Upcoming Series and Films: 2025 मध्ये अनेक उत्तम वेब सीरिज आणि चित्रपट दिग्गज ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहेत.

Netflix 2025 Upcoming Series and Films

1/12
या वर्षी तुम्हाला नेटफ्लिक्सवर मनोरंजनाचा पूर्ण डोस मिळणार आहे. खरं तर, या वर्षी या महाकाय व्यासपीठावर वेगवेगळ्या आशयाच्या अनेक वेब सीरिज आणि चित्रपट प्रदर्शित होतील. अलीकडेच नेटफ्लिक्सनं 2025 मध्ये प्रदर्शित होणारे नवे चित्रपट आणि वेब सीरिजचा प्रिव्ह्यू रिलीज केला आहे.
2/12
आर. माधवन आणि फातिमा सना शेख यांचा रोमँटिक कॉमेडी चित्रपट 'आप जैसा कोई भी' या वर्षी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या टीझरमध्ये माधवन आणि शेख यांच्यातील केमिस्ट्रीनं चाहत्यांच्या मनाला स्पर्श केला आहे. हा चित्रपट प्रेमात पडणाऱ्या दोन अनोळखी व्यक्तींची कहाणी आहे.
3/12
कीर्ती सुरेश आणि राधिका आपटे यांची अक्का ही वेब सीरिजही या वर्षी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. या शोची कथा 1980 च्या दशकातील दक्षिण भारतातील एका शहराच्या कथेवर आधारित आहे.
4/12
शेफाली शाहची मोस्ट पॉप्युलर सीरिज दिल्ली क्राईमचा सीझन 3 देखील नेटफ्लिक्सवर रिलीज होईल. या वेब सीरिजची अनेकजण आतुरतेनं वाट पाहत आहेत.
5/12
सैफ अली खान आणि जयदीप अहलावत यांचा हाय ऑक्टेन अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपट ज्वेल थीफ - द हाइस्ट बिगिन्स देखील नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.कोहरा मालिकेचा दुसरा सीझनही यावर्षी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. सस्पेन्स आणि इमोशननं भरलेल्या या सीरिजमध्ये बरुण सोबती आणि मोना सिंह पुन्हा एकदा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
6/12
कोहरा मालिकेचा दुसरा सीझनही यावर्षी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. सस्पेन्स आणि इमोशननं भरलेल्या या सीरिजमध्ये बरुण सोबती आणि मोना सिंह पुन्हा एकदा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
7/12
'मंडला मर्डर्स' ही वेब सीरिज चरणदासपूर नावाच्या शहरात झालेल्या एका हत्येभोवती फिरते. या चित्रपटात वाणी कपूर आणि सुरवीन चावला मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हे नेटफ्लिक्सवर देखील प्रदर्शित होणार आहे.
8/12
या वर्षी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणाऱ्या चित्रपट आणि वेब सीरिजच्या यादीत ईशान खट्टर आणि भूमी पेडणेकर स्टारर 'द रॉयल्स'चाही समावेश आहे. याचं दिग्दर्शन प्रियंका घोष आणि नुपूर अस्थाना यांनी केलं आहे.
9/12
शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' या वेब सीरिजमधून ओटीटीवर पदार्पण करत आहे. हा शो नेटफ्लिक्सवरील सर्वात बहुचर्चित वेब सीरिजपैकी एक आहे.
10/12
आर. माधवनचा स्पोर्ट्स ड्रामा 'टेस्ट' देखील या वर्षी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात नयनतारा आणि सिद्धार्थ देखील दिसतील.
11/12
कपिल शर्माच्या कॉमेडी शो 'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा तिसरा सीझन देखील नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
12/12
खुशी कपूर आणि इब्राहिम अली यांचा रोमँटिक चित्रपट 'नादानियां' देखील यावर्षी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं पहिलं गाणं नुकतंच प्रदर्शित झालं ज्यामध्ये इब्राहिम आणि खुशीची केमिस्ट्री लोकांना खूप आवडली.
Sponsored Links by Taboola