Nehha Pendse : 'या' कारणाने नेहा पेंडसे ट्रोल; काय आहे प्रकरण?

मराठी चित्रपटसृष्टीबरोबरच हिंदी मालिकेमधून देखील प्रेक्षकांच्या भेटीस येणारी अभिनेत्री नेहा पेंडसे (Nehha Pendse) सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. (photo:nehhapendse/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
नेहा वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करते. जानेवारी 2020 मध्ये नेहानं शार्दुल सिंह बयास (Shardul Singh Bayas) यांच्यासोबत लग्नगाठ बांधली. (photo:nehhapendse/ig)

नेहा ‘भाभी जी घर पर हैं’या छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिकेमध्ये नेहानं प्रमुख भूमिका साकारली. नेहा सध्या या मालिकेमुळे चर्चेत आहे. (photo:nehhapendse/ig)
काही दिवसांपूर्वी नेहानं पाती शार्दुलसोबतचा फोटो शेअर केला होता. हा फोटो शेअर केल्यानंतर अनेकांनी तिला ट्रोल केले. त्या ट्रोलर्सला नेहानं सडेतोड उत्तर दिलं आहे. (photo:nehhapendse/ig)
शार्दुल आणि नेहाच्या फोटोला कमेंट करून नेहाला अनेकांनी ट्रोल केले. (photo:nehhapendse/ig)
त्या ट्रोलर्सला नेहानं उत्तर दिलं, 'मला वाटतं माझ्यात असणाऱ्या करेजमुळे माझ्यावर लोक चिडतात. मी इतके वर्ष अभिनय क्षेत्रातमध्ये काम करत आहे, पण पर्सनल लाइफमुळे मी कधीच चर्चेत आले नाही. '(photo:nehhapendse/ig)
नेहानं पुढे सांगितलं, 'काही दिवसांपासून माझं नाव निगेटिव्ह पब्लिसिटीमुळे चर्चेत आलं आहे. असं का होत आहे याचा मी विचार करत आहे. लोक माझ्यावर जळतात कारण मी हिंमत दाखवून काम करते. ' रिपोर्टनुसार, भाभीजी घरपर है या सीरिजलच्या निर्मात्यांबरोबर नेहाचा वाद सुरू आहे, असं म्हटलं जात आहे. (photo:nehhapendse/ig)