Myra Vaikul : नऊवारी साडी, नाकात नथ, कपाळी चंद्रकोर, डोक्याला फेटा; चिमुकल्या मायराचं शिवजयंतीनिमित्त खास फोटोशूट

Myra Vaikul : शिवजयंती स्पेशल फोटोशूट मायराने खास शिवनेरी किल्ल्यावर केलं आहे.

Myra Vaikul

1/10
शिवजयंतीनिमित्त 'माझी तुझी रेशीमगाठ' फेम परी अर्थात मायरा वैकुळने खास फोटोशूट केलं आहे.
2/10
नऊवारी साडी, नाकात नथ, कपाळी चंद्रकोर, डोक्याला फेटा असा साज मायराने केला आहे.
3/10
शिवजयंती स्पेशल फोटोशूट मायराने खास शिवनेरी किल्ल्यावर केलं आहे.
4/10
मराठमोळ्या रुबाबातील मायराचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
5/10
'जय भवानी जय शिवाजी', 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', अशा घोषणा देत मायराने फोटो शेअर केले आहेत.
6/10
मायराने फोटो शेअर करत लिहिलं आहे, "कपाळी चंद्रकोर, नथ शोभते नाकी, गळी शोभते नाजूकशी सर आणि ठुशी नाकी डोळी नीटस जणून रेखीव घडवली मूर्ती...नऊवारी साडीतच दिसते ठसकेदार अस्सल मराठी मुलगी".
7/10
'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेच्या माध्यमातून मायरा वैकुळ घराघरांत पोहोचली आहे.
8/10
मायराचा पारंपरिक लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.
9/10
मायराने फोटो शेअर करण्यासोबत रील देखील बनवलं आहे.
10/10
मायराच्या फोटोवर जय शिवराय, जय भवानी जय शिवाजी, मराठी मुलगी, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.
Sponsored Links by Taboola